Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

दिवाणखाना

$
0
0

- डॉ. उदय कुलकर्णी

घराचं वैभव म्हणजे दिवाणखाना आणि तिथेच बऱ्याच जणांचं म्युझियमसारखे देखावे मांडणं सुरू होतं तेव्हा सर्वांचंच जगणं दिखाऊ होऊ लागतं. दिवाणखाना म्हणजे आपल्या घराचा आणि आपल्या अस्तित्वाचा आरसा असतो. आपलं व्यक्तिमत्व, घरातल्या सर्वांची उठबस असणारा, पाहुण्यांच्या स्वागताला सामोरं जाणारा हा दिवाणखाना येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांवर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप टाकत असतो.

घर लहान असो वा मोठा, प्रत्येक घरातला दिवाणखाना म्हणजे घरातलं विश्रांतीचं स्थान असतं. दिवाणखाना आटोपशीर व प्रसन्न राहण्यासाठी प्रथम काय करायचं हे सर्व इथे समजावून घेऊ.

घर प्रशस्त असेल आणि त्यातही दिवाणखाना ८०० ते १००० चौ.फूट इतका मोठा असेल तर त्याची मजा काही वेगळीच असते. कलाकुसर वा वैभव दाखवण्यासाठी एका भागात उंची जाजम (कार्पेट) किंवा काश्मिरी गालिचा टाकून त्याच्या अवतीभवती सोफा किंवा खुर्च्यांची रचना करता येते. मोठ्या घरात एका कोपऱ्यात बसण्याची व्यवस्था तर दुसरीकडे भिंतींवर टांगलेली सुंदर पोर्ट्रेट्स वा घरातल्या मुलांचे, वडीलधाऱ्यांचे फोटो लावणं उपयोगी पडतं. जमेल तेवढा भाग मोकळा ठेऊन दिवाणखाना अधिक सुंदर दिसतो, असं जाणकार सांगतात. दिवाणखाना कितीही मोठा असला तरी तो सजवताना काही पथ्यं पाळावी लागतात. दिवाणखान्यात भरमसाठ फर्निचर ठेऊ नये. तसंच दिसली भिंत की लावले पोस्टर्स असंही करू नये. भिंतींची रंगसंगती बघून एखादंच चित्र वा दिवे लावले किंवा मोठ्या आकाराचा एलईडी टीव्ही, झुंबर लावावं. शिसवी झोपाळे किंवा वेताचा झोपाळाही मोठ्या दिवाणखान्याचं वैभव वाढवतो. रेशमी पडदे व जोडीला छोट्याशा घंटा किंवा एखादी मोठी समई दिवाणखान्यात शोभून दिसेल.

मध्यम आकाराच्या दिवाणखान्यात मात्र भिंतींवरच्या पोस्टर्सची संख्या कमी करून एखाद दुसरंच छोट्या आकाराचं पोर्ट्रेट, मध्यम आकाराचा एलईडी टीव्ही, झुंबर किंवा झोपाळा अशी संख्यात्मक कपात करावी लागते. काही वेळा एका कोपऱ्यात समई न ठेवता त्याजागी उपयुक्त टीपॉय, बसण्यासाठी छोटी बीन बॅग वा स्टूल अशा बदलांची गरज असते.

एखाद्या घरात याहून छोटा दिवाणखाना असेल तर झुंबर, झोपाळा, टीपॉय यांना स्थान न देता भिंतींवरची कपाटं व शक्य तिथे फोल्डिंगचे सोफे किंवा एकात एक जातील अशा खुर्च्या मांडाव्यात.

दिवाणखाना छोटा असो वा मोठा, हा घरातला सर्वात आकर्षक भाग असल्याने तिथे वापरलेली रंगसंगती, फर्निचर आपल्या अभिरूचीनुसार असायला हवं व वापरताना त्याची काळजी घेणंही अपेक्षित आहे. दिवाणखाना एकदा बनवला की आपलं काम संपलं असं नसून आपण स्वत: प्रत्येकाने लक्ष घालून तो कायम चांगला व व्यवस्थित ठेवला तरच तो नावाप्रमाणे वास्तूचं वैभव वाढवणारा ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>