आजकालच्या स्मार्ट गृहखरेदीदारांना मोठ्या क्षेत्रफळाच्या अवाढव्य घरांपेक्षा जागेचा सुयोग्य वापर करून बनवलेली छोटेखानी पण स्मार्ट-साइझची घरं घेण्यात जास्त रस आहे. आत्तापर्यंत दक्षिण मुंबईतली घरं म्हटली की ती मोठ्या आकाराची, लक्झरी प्रकारात मोडणारी घर असायची. ही घरं अर्थातच सर्वसामान्य गृहखरेदीदारांच्या अजिबातच आवाक्यात नसायची. ही पोकळी भरून काढण्याचं काम करणारे काही स्मार्ट प्रकल्प मुंबईत आकाराला येत आहेत. स्मार्ट होम्समध्ये इंचनइंच जागेचा सुयोग्य आणि जबाबदारीने वापर केला जातो.
स्मार्ट साइझची घरं म्हणजे नेमकं काय हे विषद करताना झारा हॅबिटॅटचे भागीदार झहीर मेमन म्हणाले, 'आजच्या ग्राहकाला उत्तमरित्या प्लान केलेली, जागेचा अजिबात अपव्यय न करणारी घरं हवी असतात. पारंपरिक रचनेच्या घरांमध्ये हॉल, किचन आणि बेडरूमला जोडणाऱ्या पॅसेजमध्ये जवळपास ७० ते ८० चौ.फूट जागा मोफत घालवली जाते. या जागेत आपण काहीच करू शकत नाही. आता मुंबईत 'जागा' किती महाग आहे, याची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे. म्हणूनच आम्ही आमच्या 'होरायझन' या प्रकल्पात अशी घरं बनवणार आहोत ज्यात जागेचा स्मार्ट पद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्यात कुठेही डेड वॉल नसतील.
वॉशिंग मशीनसारख्या आवश्यक गोष्टींसाठीही सुयोग्य जागा असेल. सगळं काही नेटकं असेल पण त्याचबरोबर या घरांमध्ये मोकळेपणाही असेल.' मेट्रो जीवनशैलीला अनुरूप असणारी अशी स्मार्ट साइझची घरं बांधणं ही आजची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट