बाहेर जाताना घरातले सर्व दिवे बंद करायला विसरू नका. आवश्यक वाटल्यास एक फ्लोरोसण्ट लाइट बल्ब लावा.
मोबाइलची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर प्लग बंद करायला विसरू नका. मोबाइल चार्ज होत नसला तरी त्यातून सतत विद्युत पुरवठा होत असतो.
बिल्डिंगच्या आवारात झाडं लावा.
बाथरूममध्ये कमी प्रवाह असलेला शॉवर बसवून घ्या. त्यामुळे पाण्याची बचत होईल.
तोंड किंवा हात पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर न करता टॉवेलचा वापर करावा.
घरात झाडं लावा. झाडं आजूबाजूचं प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे वातावरण चांगलं राहतं.
वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर नेहमीच पूर्ण मोडवर वापरू नका. जेव्हा कमी प्रमाणात कपडे किंवा भांडी असतील तेव्हा हाफ मोडवर ठेवा.
प्रत्येकवेळी तापमान जास्त ठेवलंच पाहिजे असं जरूरी नाही. सध्याचे डिटर्जंट तुमचे कपडे आणि भांडी कमी तापमानातसुद्धा स्वच्छ करू शकतात.
महिन्यातून एकदा तरी एअर कंडिशनरचा फिल्टर स्वच्छ करा किंवा बदला.
चहा-कॉफीसाठी थर्माकॉल किंवा प्लॅस्टिकच्या कपापेक्षा मगचा वापर करा.
घराबाहेर लाइट लावण्याऐवजी डिमरचा वापर करा.
जुन्या खिडक्यांच्या जागी हवेशीर खिडक्या बसवा.
ऊर्जाबचत करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घ्या.
शक्यतो केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करण्यापेक्षा कपड्याचा वापर करा.
पाणी गरम करण्यासाठी किंवा घरातल्या इतर कामांसाठी सोलार पॉवरचा वापर करा.
घरात कुठे पाण्याची गळती नाही आहे ना याकडे लक्ष द्या. असल्यास वेळीच दुरूस्त करून घ्या.
कागदाऐवजी कपड्याचा नॅपकिन वापरा.
एकदा वापरून फेकून द्यायच्या भांड्यांपेक्षा पुन्हा वापरता येणाऱ्या भांड्यांचा वापर अधिक करावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट