Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

प्रभु

$
0
0

भाडेकरू इमारतींनाही वाढीव चटई क्षेत्र

चंद्रशेखर प्रभु

...........................

आमची मुलुंड पूर्व येथे ५० वर्षे जुनी निवासी इमारत आहे. ५३३ चौरस मीटर भूखंडावर ही इमारत असून इमारत ६० फुटी मुख्य रस्त्यालगत आहे. इमारतीत वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या १६ निवासी सदनिका आहेत. तसेच अंदाजे १५० चौरस फूट क्षेत्रफळाचे पाच अनिवासी गाळे आहेत. इमारतीच्या टेरेसवर मालकांची अंदाजे ५५० चौरस फुटांची निवासी सदनिका आहे. इमारत मोडकळीला आलेली होती. मुंबई महानगरपालिकेने ३५४ नोटिशीद्वारे ती वास्तव्यास धोकादायक असल्याचे घोषित केले असल्याने इमारतमालकाने २०१५मध्ये ती पाडली. इमारतीत राहणारे भाडेकरू आणि मालकही बेघर झाले असून सर्वजण दुसरीकडे भाड्याने घरे घेऊन राहत आहेत. इमारतीच्या पुनर्विकासासाठी मालकांकडे व भाडेकरूंकडेही पैसे नाहीत. सर्व कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठी कुटुंबे आहेत. आता सरकारच्या सुधारित नियमावलीनुसार इमारतमालक व भाडेकरू यांनी एकत्र येऊन इमारतीचा पुनर्विकास बँकेची मदत घेऊन करायचे ठरवले, तर कोणकोणते फायदे मिळतील? इमारत किती मजल्यांची व सदनिकांची असू शकेल? बँकेने दिलेले अर्थसाह्य बँक कशा रीतीने वसूल करते? आम्ही सर्वच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहोत, तर बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरता आम्ही रक्कम कशी उभी करू शकतो? कृपया मार्गदर्शन करावे.

................................

नवीन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये भाडेकरू इमारतींनाही वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाचा फायदा देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या जमिनीवर जितके चटईक्षेत्र सध्या बांधले गेले आहे, त्यापेक्षा किमान साडेतीनपट चटईक्षेत्र नवीन इमारतीत मिळण्याची शक्यता आहे. त्यात आपल्या सर्वांना घरे तर मिळतीलच व उरलेली जागा आपणास विक्रीसाठी उपबलब्ध होईल. विक्री करावयाच्या जागांची विक्री करून आपण बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकता. आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा विचार करून चटई क्षेत्र निर्देशांक ठरवला जात नाही हे लक्षात घ्यावे व योग्य निर्णय घेऊन आपली समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. एक लक्षात घ्या, इमारतीचा पुनर्विकास कसा शक्य होईल याचाच विचार करून चटई क्षेत्र निर्देशांक वाढवला जातो. तसा तो आपल्यासारख्या इमारतींच्याबाबतीही वाढवला गेला आहे. आपण व मालक जर एकत्रित आलात तर वित्तीय साह्य लगेचच मिळेल व विकीकरता राखीव ठेवलेल्या सदनिकांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम ही काढलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यास पुरेशी असेल. आपण या योजनेचा अभ्यास करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा म्हणजे आपल्या प्रश्नाची सोडवणूक निश्चित होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles