Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

पोटभाडेकरू नाममात्र सभासद असावा

$
0
0

प्रश्न

उपविधी क्रमांक २०नुसार पोटभाडेकरूस १००रु. प्रवेश फी भरून मूळ सदस्यामार्फत भाडेकरूने अर्ज केलेला असल्यास संस्था पोटभाडेकरूस संस्थेचा नाममात्र (nominal) सभासद म्हणून दाखल करून घेऊ शकेल अशा आशयाचे विधान आहे. तसेच उपविधी क्र.२६नुसार नाममात्र सदस्यास सभासद म्हणून कोणतेही हक्क राहणार नाहीत असेही विधान आहे. मूळ सभासद पोटभाडेकरू ठेवताना उपविधी क्र. ४३नुसार मूळ सभासद व पोटभाडेकरू यांच्यातील लिव्ह अँड लायसन्स करारपत्राची प्रत व पोलिस स्टेशनचा दाखला इ. संस्थेकडे सादर करतो. करारनाम्यातील शर्तीनुसार सभासद पोटभाडेकरूला भाड्याने राहण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही अधिकार देत नाही. तसेच उपविधी क्र.२६नुसार पोटभाडेकरूस कसलेही हक्क मिळत नाहीत. असे असताना कुणीही पोटभाडेकरू १०० रु. फी भरून नाममात्र सदस्यत्व कसा घेऊ शकेल? उपविधी २० आणि २६ असण्याचे प्रयोजन काय? तसेच पोटभाडेकरूस नाममात्र सभासद करून घेण्याबाबत सक्ती आहे का?
बाळकृष्ण ज. सावंत, बोरीवली (प.)

उत्तर

तुम्ही उपविधींची जी कलमे उद्धृत केली आहेत, त्यांच्यात कोणतीही परस्परविसंगती नाही. ही कलमे एकत्रितपणे एक पूर्णपणे वैध कायदेशीर प्रक्रिया अंमलात आणतात. हे खरे आहे, की सोसायटीच्या मूळ सभासदाशी रीतसर करार केलेल्या व्यक्तीला पोटभाडेकरू म्हणून केवळ त्या जागेत राहण्यापुरतेच अधिकार मिळतात. महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट(१९६०)च्या कलम २४(२)प्रमाणे ‘नाममात्र सभासदास मूळ सभासदास असलेले कोणतेही हक्क अथवा विशेषाधिकार असणार नाहीत.’ त्याचप्रमाणे कलम २७ असे म्हणते, की सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार नाममात्र सभासदास नाही. त्यामुळे तुम्ही उपविधीतील ज्या तरतुदी नमूद केल्या आहेत, त्या सहकार कायद्याशी सुसंगतच आहेत. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे, त्या संदर्भातील कायदेशीर बाजू समजून घ्यायची, तर सहकार कायद्यातील उपयोजना लक्षात घेतली पाहिजे. सहकारी गृह संस्था ही जमीन व इमारत यांची मालक असते, तर तिचा सभासदास त्याला वाटप झालेल्या जागेचा ताबा घेण्याचा अधिकार असतो. सदनिकाधारक सभासद जेव्हा लिव्ह अँड लायसन करार करतो तेव्हा काही काळासाठी त्या जागेचा ताबा तो लायसन्सी, म्हणजेच भाडेकरूला सुपूर्द करत असतो. अशा प्रकारे मूळ सभासद आणि भाडेकरू यांच्यात करारात्मक संबंध (contractual relationship)प्रस्थापित होते. मात्र भाडेकरू आणि मालमत्तेची मालक असूनही सोसायटी यांच्यात अशी contractual relationship नसते. भाडेकरूला नाममात्र सभासद करून घेतल्यानंतर तो आणि सोसायटी यांच्यात असा संबंध प्रस्थापित होऊ शकतो. नाममात्र सभासदास उपविधींचे पालन करणे बंधनकारक आहे तसेच गरज पडल्यास मूळ सभासद आणि भाडेकरू यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सोसायटीस आहे. उदाः लायसन कालावधी संपल्यांतरही जर भाडेकरू जागा सोडत नसेल, तर त्याला जागेबाहेर काढण्याचे अधिकार सोसायटीस आहेत. मात्र भाडेकरूस नाममात्र सभासद करून घेतलेले नसेल, तर असे करणे शक्य नाही. त्यामुळे आपली सदनिका लिव्ह अँड लायसनवर देताना मूळ सभासदाने पोटभाडेकरूस सोसायटीचा नाममात्र सभासद करून घेणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>