घाटकोपरचा पूर्वेकडचा भाग ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून जवळ आहे. त्यामुळे या उपनगराच्या अन्य भागांपेक्षा घाटकोपर पूर्व भागाची कनेक्टिविटी अधिक चांगली आहे. वर्सोव्यात श्रीमंत लोकांची वस्ती आहे. अनेक नामांकित लोक वर्सोव्यात राहतात.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये वर्सोवा हे एक अपमार्केट ठिकाण समजलं जातं. त्यातुलनेत घाटकोपरला अद्याप तितकं ग्लॅमर प्राप्त झालेलं नाही. पण कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा भाग वर्सोव्यापेक्षा उजवा आहे कारण पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गामुळे चारी बाजूंनी त्याला चांगली कनेक्टिविटी प्राप्त झाली आहे. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडच्या दोन्ही बाजूंचा पट्टा निवासी भाग म्हणून नावारूपाला आला आहे.
वर्सोव्यात श्रीमंत लोकांचं वास्तव्य अधिक आहे तर घाटकोपरमध्ये संमिश्र वस्ती आहे. घाटकोपरची वस्ती पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभागली गेली आहे. दोन्ही भागांमध्ये सुमारे ७ किमी लांबीची रेल्वेलाइन आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी हे भाग निश्चित करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्याव्यात.
किमतींचा कल
कुठल्याही भागातल्या प्रॉपर्टीच्या किमती पूर्वी आणि सध्या कशा आहेत, यावरच त्यांचं भविष्य अवलंबून असतं. ज्या भागातल्या किमतींमध्ये फारशी सुधारणा होत नसेल त्या भागातल्या मालमत्तांना फार चांगलं भविष्य असेलच असं नाही. दोन भागांची तुलना केली तर वर्सोव्यात प्रॉपर्टीचे दर सरासरी २६,३१५ रु.प्रति चौ.फू. असे आहेत तर घाटकोपरमध्ये ते सरासरी २६,३१५ रु. प्रति चौ.फू. एवढे आहेत. मध्यंतरी या दोन्ही ठिकाणच्या दरांमध्ये किंचितशी घसरण झाली होती. प्रॉपर्टी वेबसाइट 'मॅजिकब्रिक्स'च्या रँकप्रमाणे वर्सोवा ९४ तर घाटकोपर ३१७ क्रमांकावर आहे. 'मॅजिकब्रिक्स'ने तब्बल मुंबईतल्या ११६१ ठिकाणंचं रँकिंग केलं आहे.
मालमत्तांचं मूल्य
सर्वसाधारणतः घाटकोपरमध्ये अपार्टमेण्ट प्रकारातल्या प्रॉपर्टीलाच आणि त्यातही २बीएचकेला अधिक मागणी आहे. साधारणतः ४०० ते १२०० चौ.फू. आकारची घरं मिळतात. त्यांच्या किमती या १-२ कोटी रुपयांपासून चालू होतात. वर्सोव्यात घरांचे अनेक प्रकार ग्राहकांना मिळू शकतात. अपार्टमेण्ट, व्हिलाज, बिल्डस फ्लोअर्स आदी. या भागात ३बीएचके घरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करण्यात येते. त्यांच्या किमती २ ते ५ कोटी रुपयांच्या रेंजमध्ये आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ १२०० ते १७०० चौ.फूट आहे.
पायाभूत सुविधा
घाटकोपर पूर्व हा भाग ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून जवळ आहे. त्यामुळे या उपनगराच्या अन्य भागांपेक्षा घाटकोपर पूर्व भागाची कनेक्टिविटी अधिक चांगली आहे. एवढंच नाही तर पूर्व भागातल्या रस्त्यांची रूंदी ही पश्चिम भागातल्या रस्त्यांपेक्षा अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, 'घाटकोपर पूर्व भागातल्या सांडपाण्याची व्यवस्था पश्चिम भागापेक्षा अधिक चांगली आहे. पश्चिम भाग हा सखल असल्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचण्याच्या घटना घडतात. अरूंद रस्त्यांमुळे घाटकोपर पश्चिममध्ये वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.
लोकवस्ती
घाटकोपर पूर्व भागात गुजराती भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यापैकी अनेकजण व्यावसायिक आणि हिरे व्यापारी आहेत. तर घाटकोपर पश्चिम भागात गुजराती, मुस्लीम आणि मराठी लोकांची वस्ती आहे. वर्सोव्यात श्रीमंत लोकांची वस्ती आहे. अनेक नामांकित लोक वर्सोव्यात राहतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट