Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

नवीन लोणावळाः एक निवांत अनुभव

$
0
0

- रुई गावंड

वीकएण्ड होमसाठीच्या उत्तम ठिकाणाचे सर्व निकष नवीन लोणावळ्याला लागू पडतात. प्रदूषणरहित प्रसन्न हवा, निसर्गरम्य भवताल आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावाही! लोणावळ्यासारख्या गर्दीच्या आणि आता महागड्या बनलेल्या ठिकाणी वीकएण्ड होम घेण्यापेक्षा नवीन लोणावळ्याचा पर्याय सर्वार्थाने सुयोग्य आहे.

गर्दी, गोंगाट आणि प्रदूषण यापासून शहरात राहणाऱ्यांना सुटका हवी असते. त्यामुळे वेळ मिळाला की ते मुंबईबाहेर जाण्याची संधी शोधत असतात. काहींना तर शहराबाहेरचं एखादं ठिकाण इतकं आवडतं की तिथे वीकएण्ड होमच घेतात. पूर्वी मुंबईबाहेर घर म्हटलं की थेट लोणावळा, खंडाळ्याला लोक अधिक पसंती द्यायचे. थंड आणि प्रदूषणरहित हवा, आल्हाददायक वातावरण आणि सुंदर निसर्ग यामुळे लोणावळ्यात वीकएण्ड होम्सची संख्या वाढत गेली. टुमदार लोणावळ्याचं रूपांतर शहराचं झालं आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं. या लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर असणारं आणि त्याहून काकणभर सरस असलेलं ठिकाण म्हणजे 'नवीन लोणावळा'.

लोणावळा हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २०५० फुटांवर आहे तर नवीन लोणावळा २२०० फुटांवर आहे. लोणावळ्यातली थंडी बोचरी असते पण नवीन लोणावळ्यातला गारवा सुखद असतो. तो मनाला उभारी देतो. त्यामुळे थंडीच्या मोसमातही आपण प्रफुल्लित राहतो. लोणावळ्यात बंगले आणि हॉटेल्सची इतकी गर्दी झाली आहे की त्यामुळे इथलं नैसर्गिक सौंदर्यच पुरतं झाकोळून गेलं आहे. पण नवीन लोणावळ्यात बांधकामाची गर्दी नसल्यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याचा आपल्याला भरभरून आनंद घेता येतो.

लोकप्रिय ठिकाण असल्याने लोणावळ्यामध्ये वाहनांची नेहमीच गर्दी असते. शिवाय मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यामुळे इतर प्रकारचे प्रदूषणही इथे मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सर्व प्रदूषणांपासून नवीन लोणावळा मुक्त आहे.

लोणावळा हे श्रीमंत मंडळींच्या आरामाचं ठिकाण बनलं आहे. त्यामुळे सध्या ५००० ते ६००० चौ.फूट असा जागेचा दर असणाऱ्या लोणावळ्यात सर्वसामान्य गुंतवणूकदाराला घर बांधता येणे शक्यच नाही. पण लोणावळ्यासारख्याच निसर्गरम्य नवीन लोणावळ्यामध्ये ते आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात. कारण इथला सध्याचा जागेचा दर अंदाजे ३००० ते ४००० रु. प्रति चौ. फूट इतका आहे.

पुणे जिल्ह्यात येणारे नवीन लोणावळा हे मुंबईपासून १०० कि.मीवर तर लोणावळ्यापासून अवघ्या १४ किमी अंतरावर आहे. नवीन लोणावळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांशी असणारी उत्तम कनेक्टिव्हिटी. नवीन लोणावळ्याला जाण्यासाठी रस्ते तसंच रेल्वे अशा दोन्ही मार्गांचा अवलंब करता येतो. त्यामुळे इथे वीकएण्ड होम असणाऱ्या मंडळींना आपल्या वीकएण्डच्या घरी पोहोचण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत.

अशा या निसर्गसंपन्न नवीन लोणावळ्यात नम्रता डेव्हलपर्स आणि 'दिशा डायरेक्ट'चा 'बर्डस व्ह्यू' हा प्रकल्प आकाराला येत आहे. हा प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि इथेच पॅराग्लायडिंगसाठीचा अधिकृत बेस आहे. त्यामुळे 'बर्डस व्ह्यू'मध्ये उभं राहिल्यास आपल्या माथ्यावर हे पॅराग्लायडर्स स्वच्छंदपणे विहार करताना दिसतील. त्यांना खालच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते म्हणूनच या प्रकल्पाला 'बर्डस व्ह्यू' असं म्हटलं आहे.

'बर्डस व्ह्यू'मध्ये 'अझालिया', 'लायलॅक' आणि 'झिनिया' अशा तीन इमारती असून त्यात स्टुडिओ, वन आणि टूबीएचके अपार्टमेण्टसचा समावेश आहे. या अपार्टमेण्टसच्या किमती अनुक्रमे १४ लाख, २२ लाख आणि ३० लाख रुपये अशा आहेत.

'बर्डस व्ह्यू'मधल्या सुविधा म्हणजे दिमाखदार प्रवेशद्वार, प्लाझा फाऊंटन, वेटिंग/सीटिंग प्लाझा, मल्टिपर्पज लॉन, स्वीमिंग पूल, मुलांसाठी खेळण्याची खास जागा, इनडोअर प्ले एरिया आणि लिफ्ट तसंच सार्वजनिक लाइटिंगसाठी जनरेटर बॅकअप.

नवीन लोणावळा हे ठिकाण सध्या हॅपनिंग आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. पवना डॅम, कार्ल्याचं एकविरा देवीचं मंदिर अशी अनेक पर्यटनस्थळं इथून जवळच आहे. आंतरराष्ट्रीय राइड्सनी सुसज्ज असणारं 'वेट अॅण्ड जॉय' हे वॉटरपार्कही इथून जवळ आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्याबरोबर इथे मनोरंजनाचीही अनेक साधने आहेत.

या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना दिशा डायरेक्टचे रिजनल हेड सुहास क्षीरसागर म्हणाले,

'नवीन लोणावळामधल्या आमच्या या प्रकल्पाला गुंतवणुकदारांचा खूपच चांगला प्रतिसाद लाभला. तीन महिन्यांमध्ये आम्ही १५० फ्लॅट्स विकले. लोणावळ्याचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण झाल्याने गुंतवणुकदार नव्या स्थळाच्या शोधात होते. नवीन लोणावळा हे लोणावळ्यापासून अवघ्या १४ किमीवर असून तिथला निसर्ग आणि वातावरण सर्वार्थाने वेगळे आहे. बर्डस व्ह्यू हा प्रकल्प मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला लागूनच असल्यामुळे तिथे पोहोचणंही एकदम सोपं आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात असणारी वीकएण्ड होम्स शहरापासून आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या सुविधांपासून दूरच असतात. परंतु 'बर्डस व्ह्यू'च्या बाबत तसं नाही. हॉस्पिटल, बँका, शाळा, बाजारपेठ या आवश्यक सुविधा इथून हाकेच्या अंतरावर आहेत.

उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गरम्य वातावरण, किफायतशीर किंमत यामुळे 'बर्डस व्ह्यू'मधली गुंतवणूक अतिशय लाभदायक ठरणार आहे.'

काही समाधानी ग्राहकांच्या प्रतिक्रिया

करिअरच्या सुरुवातीलाच 'बर्डस व्ह्यू'च्या रूपाने मनातलं सेकंड होमचं स्वप्न प्रत्यक्षात आणता आलं. हा प्रकल्प हायवेला लागूनच आहे शिवाय स्वीमिंग पूल, गार्डन, प्ले एरिया अशा सर्व आधुनिक सुविधा इथे तयारच मिळत असल्याने मी पहिल्या भेटीतच या प्रकल्पाच्या प्रेमात पडलो. माझे कुटुंबिय, कॉलेज तसेच ऑफिसची मित्रमंडळी यांच्यासोबत वीकएण्ड घालावण्यासाठी नवीन लोणावळ्यासारख्या ठिकाणी मी माझं परफेक्ट सेकण्ड होम घेऊ शकलो, याचा मला अभिमान वाटतो.

नितीश तांबवे, लायलॅक, फ्लॅट क्र. बी२/७०२

निवृत्तीनंतरचे आयुष्य शांत, निसर्गरम्य ठिकाणी व्यतीत करायचं हे आम्ही आधीपासूनच ठरवलं होते. योगायोगाने दिशा डायरेक्टच्या 'बर्डस व्ह्यू'ची जाहिरात पाहण्यात आली. ती पाहिल्यानंतर मनात पहिला विचार आला की हेच ते ठिकाण. आम्ही लगेच प्रकल्पाला भेट दिली. सॅम्पल फ्लॅट पाहून मन सुखावलं. थंड हवा, हिरवेगार डोंगर आणि प्रकल्पातल्या सुखसुविधा पाहून तिथल्या तिथे घर घेण्याचा निर्णय घेऊन टाकला. लोणावळ्यासारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळापासून जवळच असणाऱ्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर घेता आलं, याच समाधानच खूप मोठं आहे.

स्नेहल देव, अझालिया, फ्लॅट क्र. ए३/२०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>