Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

कर्जदारांचा कल; मध्यम कालावधीतील गृह कर्जांना मिळतेय पंसती

$
0
0


मुंबई : गृहकर्जांचे व्याज दर नीचांकी पातळीवर आहेत. जवळपास ५१ टक्के घरखरेदीदार १५ वर्षांपेक्षा कमी कर्ज कालावधी निवडणे पसंत करत आहेत. मॅजिकब्रिक्सने नुकत्याच केलेल्या होम लोन्स कन्ज्युमर पोलमध्ये हे आढळून आले आहे.

निफ्टी रेकॉर्ड स्तरावर; शेअर बाजारात तेजीचा बोलबाला, 'या' क्षेत्रात खरेदीचा ओघ
घरखरेदीदार गृहकर्जांच्या परतफेडीसाठी १० वर्षांचा कालावधी निवडण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचा या सर्वेक्षणाचा (सॅम्पल साईझ ५००) निष्कर्ष आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी २६ टक्के ग्राहकांनी तसे मत नोंदवले आहे, तर २५ टक्के ग्राहकांनी १० ते १५ वर्षे आणि २३ टक्के ग्राहकांनी १५ ते २० वर्षे कालावधी निवडू असे सांगितले आहे. जवळपास १६ टक्के ग्राहकांचे मत आहे की, ते २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज घेतील तर फक्त १० टक्के ग्राहकांनी २० ते २५ वर्षांसाठी कर्ज घेण्याची इच्छा दर्शवली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा दर
मॅजिकब्रिक्स होम लोन्सवर निदर्शनास आलेल्या ग्राहकांच्या वागणुकीवरून असे समजते की, गृहकर्जांसाठी बहुतांश मागणी बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि पुणे या प्रमुख निवासी बाजारपेठांमधून येत आहे. ग्राहकांच्या सवयी आणि प्राथमिकतांबाबत प्रतिक्रिया देताना मॅजिकब्रिक्सचे सीईओ सुधीर पै यांनी सांगितले. मध्यम आणि उच्च श्रेणीतील घरांसाठी गृहकर्जांच्या मागणीत वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. घरून काम करावे लागत असल्याने अतिरिक्त खोलीची गरज, सर्कल दर व स्टॅम्प ड्युटीमध्ये घट आणि कमी व्याज दर असे अनेक घटक याला कारणीभूत ठरत आहेत.

चोक्सीचा तोरा उतरला; जखमी, भेदरलेल्या अवस्थेतील फोटो व्हायरल
सध्या गृहकर्जांवरील व्याज दर सरासरी ६.६५ ते ६.९० टक्क्यांच्या दरम्यान असल्याने या दराने कर्जाची परतफेड जितक्या लवकर करता येईल तितके बरे अशी भावना ग्राहकांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के ग्राहक परतफेडीसाठी १० वर्षांपर्यंत किंवा १० ते १५ वर्षांचा कालावधी निवडत असून, या आर्थिक जबाबदारीतून शक्य तितक्या लवकर मुक्त होण्याला प्राथमिकता देत आहेत.

रियल इस्टेट डील्ससाठी वाटाघाटी करण्याची योग्य वेळ
गेल्या एक दशकाच्या किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या तुलनेत सध्याचे गृहकर्जांवरील व्याज दर सर्वात कमी आहेत. त्यामुळे तज्ञांच्या मतानुसार सर्वोत्तम रियल इस्टेट डील्ससाठी वाटाघाटी करण्यासाठी, व्यवहारांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. अनेक सार्वजनिक व खाजगी बँका आणि इतर आर्थिक संस्थांनी त्यांचे गृहकर्जांवरील व्याज दर कमी केले आहेत, यामुळे ग्राहकांच्या घरखरेदीच्या महत्त्वाकांक्षेला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये रेपो रेटमध्ये काहीही बदल न करता तो ४ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने कितीतरी बँकांनी घरखरेदीच्या वाढत्या मागणीला अधिक तेजी देण्यासाठी गृहकर्जांचे व्याज दर ७ टक्क्यांपेक्षा कमी ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>