प्रॉप इक्विटी या संस्थेच्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात देशभारत ३४०७५ सदनिकांची विक्री झाली. फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत यंदा विक्री समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. चेन्नई आणि पुण्यात घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
लॉकडाउनच्या धास्तीने सोने महागले ; महिनाभरात झाली मोठी वाढ, जाणून घ्या आजचा भाव
स्थावर मालमत्ता क्षेत्र डिसेंबरच्या तिमाहीपासून सावरत आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये घरांची मागणी वाढली असल्याचे दिसून आले आहे. देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगात सुरु आहे. येत्या काही महिन्यात जास्तीत जास्त नागरिकांना लस दिली जाईल. यामुळे अर्थव्यवस्था सावरेल आणि घरांना पुन्हा मागणी वाढेल ,असे मत प्रॉप इक्विटीचे संस्थापक समीर जासूजा यांनी व्यक्त केले.
शेअर बाजार सावरला ; बँंकाच्या शेअरला मागणी,सेन्सेक्स - निफ्टीत झाली वाढ
सणासुदीच्या हंगामासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ऑफर्स विकासकांनी जाहीर केल्या आहेत. प्रॉप इक्विटीच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२१ मध्ये ३४०७५ घरांची विक्री झाली. त्यात गत वर्षाच्या तुलनेत किंचित घसरण झाली. फेब्रुवारी २०२० मध्ये ३४३७६ घरांची विक्री झाली होती.
टाटा ग्रुप सरसावला ; ऑक्सिजन पुरवठ्यासाठी घेतला हा निर्णय, पंतप्रधानांनी केलं कौतुक
घरांच्या एकूण विक्रीमध्ये चेन्नई आणि पुण्यात घर विक्रीत चांगली वाढ दिसून आली. गत वर्षाच्या तुलनेत चेन्नईतील घरांच्या विक्रीत २२ टक्के आणि पुण्यातील घरांच्या विक्रीत १८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर दिल्ली एनसीआर परिसरातील विक्रीत मात्र ४० टक्के घसरण झाली असल्याचे प्रॉप इक्विटीच्या अहवालात म्हटलं आहे.
पाण्याशी निगडीत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक; बीएनपी परीबासचा 'फंड्स अॅक्वा' खुला
करोनाची दुसरी लाट सध्या देशात थैमान घालत आहे. करोनाचा परिणाम आणखी काही आठवडे जाणवेल, तोपर्यंत स्थावर मालमत्ता क्षेत्रातला प्रतीक्षा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. काही निवडक हौसिंग प्रोजेक्टमधील घरांना मागणी आहे. मात्र दीर्घकाळ लॉकडाउन राहिला तर पुन्हा ग्राहकांच्या मनावर विपरीत परिणाम होतील. इच्छुक ग्राहक घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकतील, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
करोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी लागू केलेला लॉकडाउन हा अल्प कालावधी असेल. या लॉकडाउनचा किंचित परिणाम बांधकाम व्यवसायावर होईल, असा आशावाद अँबियन्स ग्रुपचे विपणन प्रमुख अंकुश कौल यांनी व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट