Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

सोसायटी - मालकीहक्काबाबत घ्या दक्षता

$
0
0

अॅड. दर्शना द्रविड, मालमत्ता विधिज्ञ

..

प्रश्न ः

माझ्या चाळीचा काही वर्षांपूर्वी पुनर्विकास करण्यात आला. त्यामुळे मला पूर्वीच्या चाळीतील १८० चौरस फूटांच्या जागेच्या बदल्यात आता २८० चौरस फूटांची सदनिका मिळाली आहे. ही सदनिका तळमजल्यावर आहे. इमारतीच्या रचनेमध्ये माझ्या घराशेजारी गोलाकार भाग आला आहे. सोसायटी रजिस्टर व्हायच्या आत तुम्हाला त्या गोलाकार भागापर्यंत २० चौरस फूट जागा वाढवून घेता येईल, असे बिल्डरने मला सांगितले. त्यामुळे मी २० चौरस फूट जागा वाढवली. सोसायटी रजिस्टर होऊन १० वर्षे उलटून गेली आहेत. नवे बांधकाम झालेल्या इमारतीत सदनिकाधारकाने जागा वाढवल्यास त्या इमारतीची सोसायटी झाल्यानंतर १० वर्षांनी ही जागा त्या सदनिकाधारकाची होते, त्यासाठी वेगळा दंड आकारला जात नाही, असे मी ऐकले आहे. याविषयी नेमके नियम कोणते आहेत? वाढवलेली जागा कोणच्याही मध्ये येत नाहीये. सोसायटीच्या इतर सभासदांनाही ती अडचणीची होत नाहीये. तरी ही जागा माझ्या मूळ सदनिकेच्या आराखड्यात दाखवलेली नाही. ती नियमित करण्यासाठी काही नियम आहेत काय? नियमित न करता तशीच वापरल्यास चालेल काय? यातून कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात? याविषयी कायदेविषयक मार्गदर्शन करावे.

- एक वाचक

उत्तर ः

कुठल्याही गृहनिर्माण संस्थेमध्ये बांधकाम हे महानगरपालिकेच्या मंजूर आराखड्यानुसार होत असते. आपल्या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला महानगरपालिकेमधून मिळाल्याचा उल्लेख दिसत नाही. परंतु ज्याअर्थी आपण वास्तव्य करत आहात त्याअर्थी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला असेल ही शक्यता गृहीत धरून सांगायचे झाल्यास २० चौरस फूट जागा जी सध्या आपल्या ताब्यात आहे , त्याचे मालकीहक्क आपणाकडे नाही. या जागेचा मालकीहक्क आपणास प्राप्त करून घ्यावयाचा असल्यास बिल्डर व सहकारी गृहनिर्माण संस्था यांचे पूर्वपरवानगीने म्युनिसिपल अथॉरिटीकडे आपणास मूळ मंजूर आराखड्यात २० चौरस फूट मोकळा भाग जो आपल्या घरासमोर आहे, त्यास आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता वास्तू विशारदाकरवी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर २० चौरस फुटांची मालकी आपल्याकडे येण्यासाठी आवश्यक ते करारपत्र मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून करणे महत्वाचे आहे.

तसे न केल्यास आपल्या कडे फक्त ताबा आहे पण मालकी आपल्याकडे नाही अशी काहीशी स्थिती असेल, ज्यास गृहनिर्माण संस्था नक्कीच हरकत घेऊ शकते. तसेच भविष्यात ती जागा विकताना फक्त ताबा असणे काही उपयोगी ठरत नाही, तर त्यास कायद्याची मंजुरी हवी याची नोंद घ्यावी.

..

प्रश्न ः

सोसायटी मेन्टेनन्स निश्चित करताना सोसायटीच्या सभासदाला किंवा सदनिका धारकाला एकपट मेन्टेनन्स आणि त्या सदनिकेत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या भाडेकरूला दीड पट मेन्टेनन्स असा काही नियम आहे का?

- सुभाष जाधव

उत्तर ः

प्रथमतः हा मुद्दा लक्षात घ्यावा की, सहकारी गृहनिर्माण संस्था भाडेकरूकडून कधीही संस्थेचे देय शुल्क घेत नाही. असे शुल्क मूळ सभासदाला किंवा सदनिकाधारकाला भरायचे असते. ज्यामध्ये सदनिका भाडेतत्त्वावर दिल्याकारणाने आकारले जाणारे बिन भोगवटा शुल्क किंवा 'नॉन ऑक्युपन्सी चार्जेस' याचा समावेश होतो.

सहकारी गृहनिर्माण संस्थेत भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकेबाबत दिनांक १ ऑगस्ट २००१ रोजी प्रसिद्ध झालेल्या क्र. 'S.G.Y.१०९४/१५१६५/क्र.३१७/१४-C सचिवालय ext/' या परिपत्रकान्वये, कोणतीही सहकारी गृहनिर्माण संस्था बिन भोगवटा शुल्क आकारताना, 'म्युनिसिपल टॅक्स' वगळता, जे सेवाशुल्क सभासदांकडून सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपविधी क्रमांक ६६ नुसार घेतले जातात, त्याच्या १० टक्के पेक्षा जास्त आकारले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>