Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

अडगळीची खोली

$
0
0

- डॉ. उदय कुलकर्णी

सर्व चांगलं असण्यासाठी कुणाला तरी वाईटपणा घ्यावा लागतो. तसंच घर चांगलं असण्यासाठी एका कोपऱ्याला, कपाटाला किंवा एका खोलीला अडगळीची खोली बनावंच लागतं.

वास्तूच्या उभारणीत सर्व गोष्टींचा विचार करताना, एका गोष्टीचा विचार फार महत्त्वाचा असतो. तो म्हणजे अतिरिक्त सामानाचा. घर छोटं असो किंवा मोठं, त्यामध्ये नित्य उपयोगाचं सामान थोडंसंच असेल आणि त्याहून जास्तीचं सामान कधीतरी उपयोगी येईल म्हणून ठेवलं असेल तर आपण ते सोफ्याखाली, कपाटात, किंवा घरातल्या कोपऱ्यात ठेवतो. अशा बिनवापराच्या किंवा कमी वापराच्या गोष्टी सतत नजरेत खुपत राहतात. पूर्वी म्हणजे अगदी ३०-४० वर्षांपूर्वी घरात या सर्व सामानाच्या नियोजनासाठी अडगळीची खोली असायची.

परदेशातही घरात एक खोली अशी अधिकच्या सामानासाठी आजही असते. गॅरेजमध्ये, गच्चीवर किंवा गॅलरीत वापरात नसलेलं सामान ठेऊन बराच काळ वापरलं नाही तर त्याचे गॅरेज सेलद्वारे घराचं स्वच्छता व्यवस्थापनही केलं जातं. घर छोटं असो किंवा मोठं अशा अडगळीच्या खोलीची गरज प्रत्येकालाच असते.

आपण कितीही प्रयत्न केला तरीही फक्त उपयोगी वस्तूच घरात आणणं व तेवढ्याच सांभाळणं होत नाही. मानवी स्वभावच आहे. थोडी साठवणूक, थोडा मोह, थोडा भविष्याचा विचार, थोडी गुंतवणूक, थोडे गैरव्यवस्थापन, काही वेळा काहीही कारणाशिवाय तर कधी आळसामुळे आपण १०० टक्के नियोजित पद्धतीने घर ठेऊ शकत नाही.

२० टक्के गरजेचे सामान ८० टक्के उपयोगी असलं तरी निरुपयोगी ८० टक्के सामान पूर्णतः फेकून देणंही शक्य नसतं. अशावेळी ही अडगळीची खोली उपयोगात येते. प्रत्येक घरात ही एक सोय असायलाच हवी. अर्थात नवीन युगात याचे स्वरूप बदलावं लागतं. स्थान व आकारात फरक करावा लागतो.

घराचं घरपण आणि सौंदर्य टिकवण्यासाठी एक अडगळीची खोली, कपाट किंवा रॅक असणं गरजेचं असतं.

घरामध्ये नेहमी न लागणाऱ्या महाग पण छोट्या आकाराच्या वस्तूंसाठी या कपाटामध्ये जागा ठेवा.

वापरात नसणाऱ्या सर्व गोष्टींची यादी करून, त्यासाठी या अडगळीच्या कपाटात जागा करा.

कपाटात कधीतरी वापराच्या गोष्टी अशा रितीने ठेवा की त्याची वर्गवारी सहज करता येईल.

जास्तीच्या टाइल्स, विटा, सिमेण्टची पिशवी, फेव्हिकॉल, हातोडा, कुदळ, फावड्यापासून पट्टी, रस्सी, प्रवासाच्या बॅगांपासून नवरात्रीच्या पूजेचं सामान, गणपतीमधल्या डेकोरेशनच्या वस्तूंसारख्या असंख्य गोष्टी आपल्याला या अडगळीच्या कपाटात ठेवता येतात.

जे सामान पाच-सहा महिने वापरात नाही ते तप्तरतेने या कपाटात जायला हवं.

दरवर्षी दोन वेळा तरी हे कपाट तपासून पाहावं.

घराला घरपण मिळवण्यासाठी दर महिन्यात घरातल्या उपयोगी, अनुपयोगी गोष्टी तपासत राहावं व घराला घरपण देणाऱ्या अडगळीच्या खोली किंवा कपाटाला नव्या स्वरूपात अस्तित्वात आणावं.

सर्व चांगलं असण्यासाठी कुणाला तरी वाईटपणा घ्यावा लागतो. तसंच घर चांगलं असण्यासाठी एका कोपऱ्याला, कपाटाला किंवा एका खोलीला अडगळीची खोली बनावंच लागतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>