तुम्ही तुमच्या घराचा पुनर्विकास करण्याचा विचार करत आहात किंवा मुंबईतली पुनर्विकसित मालमत्ता घेण्याचं तुमच्या मनात आहे का? यापैकी एका किंवा दोन्ही प्रश्नांचं उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही अशी मालमत्ता खरेदी करताना किंवा व्यवहार करताना खूप दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.
पुनर्विकसित मालमत्ता खरेदी करताना त्याच्याशी संबंधित प्रत्येक कागदपत्र खूप काळजीपूर्वक हातळणं गरजेचं आहे. करारपत्र, जुनी कागदपत्रं, संशोधनपत्रं, तपासणी यादी आदी. याशिवाय घराचा पुनर्विकास करण्यापूर्वी खालील काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत.
मुंबईत पुनर्विकसित मालमत्ता किंवा घर घेण्यापूर्वी सर्व गोष्टींचा, विशेषतः मेण्टेनन्स कॉस्टचा बारकाईने विचार करायला हवा.
मुंबईत नव्या प्रकल्पांना नव्या जागा उपलब्ध नाहीत. यापुढे मुंबईत जे काही गृहप्रकल्प उभे राहतील ते पुनर्विकासातूनच उभे राहणार असून त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
पुनर्विकासासाठी कन्सल्टण्ट किंवा वकिलाची नेमणूक करा. त्याच्यामार्फत विकासकाशी व्यवहार करणं सोपं जाईल. कायदेशीर बाबींची पूर्तता योग्य प्रकारे करता येईल.
पुनर्विकसित प्रकल्पात मालमत्ता खरेदी करताना सीसी, ओसी, पाणी व वीज जोडण्या आणि गृहकर्जाची स्थित तपासा.
शक्यतो तयार म्हणजे 'रेडी टू मूव्ह' घरच खरेदी करा. बांधकाम सुरू असलेलं आणि काही काळानंतर किंवा वर्षानंतर ताबा मिळणारं घरं घेणं टाळा. त्यामुळे अनेक अडचणी टाळता येईल.
मुंबई ग्राहक न्यायालयाने अविवाहित लोकांना घर भाड्याने घेण्यास अनुमती दिलेली आहे. वास्तविक पाहता त्यांना स्वतंत्र घर घेण्यास बंधन घालणं बेकायदेशीर आहे.
मुंबईत पुनर्विकसित मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा पर्याय हा नेहमीच फायद्याचा ठरेल असं नाही. कारण त्यात बरेचदा अनेक जोखमा असतात. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊनच अशा मालमत्तांसंदर्भातले व्यवहार करावेत.
ओसी देण्याबाबत ग्रामपंचायती बऱ्याच लवचिक असतात. त्यामुळे मालमत्ता घेताना ग्रीन झोन, फ्लॅट किंवा लॅण्ड रजिस्ट्रेशन आदी बाबी व्यवस्थित तपासा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट