Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

ईटी वेल्थ

$
0
0

म्युच्युअल फंडातून

अधिक परतावा

धीरेंद्र कुमार, ईटी

ज्येष्ठ नागरिक वा सर्वसामान्य गुंतवणूकदार हा नेहमी बँकेतील मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतो. आपल्या देशामध्ये बँकेतील मुदत ठेवींची प्रदीर्घ परंपरा आहे. गेल्या काही दिवसांत मुदत ठेवींवरील व्याजदरात काहीशी वाढही झाली आहे. मात्र ही वाढ प्रामुख्याने कर्जांवरील व्याज वाढल्याचा परिणाम आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात बँकेच्या बचत खात्यावरील व मुदत ठेवींवरील व्याजदरांत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही. अडीच ते तीन टक्के व्याज देणारी बचत खाती व पाच ते सात टक्के व्याज देणाऱ्या मुदत ठेवी यांच्यापेक्षा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास कितीतरी अधिक परतावा मिळू शकतो.

फंडांकडे पाठ का?

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत असली तरी या गुंतवणूकदारांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. फंडांविषयी माहितीचा अभाव तसेच, जोखीम घेण्याविषयीची धास्ती यामुळे ज्येष्ठ नागरिक म्युच्युअल फंडांच्या सहसा फंदात पडत नाहीत. मात्र योग्य आर्थिक सल्लागार नेमल्यास म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे कोणासही सहजसाध्य आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही केवळ जोखीमपूर्णच असते हा गैरसमजही दूर करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडात गुंतवली जाणारी रक्कम ही प्रामुख्याने सूचिबद्ध व सुस्थितीतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवली जात असल्याने शेअर बाजारातील चढउतारांचा या फंडांवर परिणाम होत नाही.

परताव्याचे प्रमाण किती?

मुदत ठेवींना पर्याय म्हणून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास लिक्विड फंड वा अति अल्पकालीन फंडांचा (अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड) पर्याय योग्य ठरतो. या फंडांच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा विचार करता त्यांनी अनुक्रमे ६.८५ ते ६.४७ टक्के परतावा दिला आहे. अधिक जोखीम पत्करण्याची तयारी असल्यास याहून कितीतरी अधिक पटीने परतावा मिळू शकतो. अधिक परतावा देणाऱ्या फंडांचीही कामगिरी गेल्या अनेक वर्षात सातत्यपूर्ण व चढतीच राहिली आहे. त्यामुळे मुदत ठेवींच्या तुलनेत म्युच्युअल फंडातून किमान दीडपट अधिक परतावा मिळतो. मुदत ठेवींवरील व्याजावर आकारण्यात येणाऱ्या टीडीएसचा विचार केला तर परताव्याचे प्रमाण आणखी वाढते.

कररचना कशी?

गुंतवणूकदाराला बँकांच्या मुदत ठेवींवर व्याज मिळते. हे व्याज करपात्र असते. सद्यस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी वार्षिक १० हजार रुपये तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक ५० हजार रुपयांपर्यंत व्याज करमुक्त आहे. ही मर्यादा पार केल्यास टीडीएस कापला जातो. दुसरीकडे, म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा कॅपिटल गेन म्हणून ओळखला जातो. यात अल्पकालीन व दीर्घकालीन भांडवली नफा कर असे दोन प्रकार असून गुंतवणुकीच्या कालावधीनुसार हा कर आकारला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles