Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

मालमत्ता वर्गवारीचा आढावा घेणे आवश्यक

$
0
0

शेअर बाजारामध्ये सध्या चढउतार अनुभवण्यास मिळत आहेत. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी मालमत्ता वर्गीकरणाचे (असेट अलोकेशन) तत्त्व नेहमी अवलंबणे आवश्यक आहे. तसेच, ठरावीक कालावधीत या वर्गीकरणाचा आढावा घेणेही तितकेच गरजेचे असते, असा सल्ला अर्थ नियोजक देतात.

मालमत्ता वर्गीकरण म्हणजे काय व एखादा लघू गुंतवणूकदारानेही हे तत्त्व पाळणे गरजेचे आहे का?

तुमच्याकडे असलेली गुंतवणूकयोग्य रक्कम कोणकोणत्या प्रकारांत गुंतवावी याविषयी मार्गदर्शक तत्त्व म्हणजे मालमत्ता वर्गीकरण. या मालमत्तेत इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड आणि रोकड याचा समावेश असतो. हे तत्त्व पाळल्यास बाजारातील चढउतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर फार परिणाम होत नाही. यामुळे तुमची जोखीमही कमी होते. मालमत्ता वर्गीकरण हे गुंतवणूकदारसापेक्ष असते. म्हणजे, प्रत्येक गुंतवणूकदाराचे मालमत्ता वर्गीकरण हे वेगवेगळे असू शकते. हे वर्गीकरण तुमचे वय, जीवनशैली, आर्थिक उद्दिष्टे, जोखीम पत्करण्याची क्षमता या निकषांवर ठरते. उदाहरणार्थ, तरुण गुंतवणूकदाराचे मालमत्ता वर्गीकरण करायचे झाल्यास त्याच्या एकूण गुंतवणूक रकमेतील ७५ टक्के वाटा हा इक्विटी म्युच्युअल फंडांचा असेल. तर, डेट म्युच्युअल फंडांसाठी २० टक्के व सोन्यासाठी पाच टक्के वाटा असेल.

अचूक व निर्दोष मालमत्ता वर्गीकरण कसे करावे?

गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता पाहून मालमत्ता वर्गीकरण कसे असावे हे अर्थ सल्लागार ठरवतात. एखाद्या गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ हा १० लाख रुपयांचा असेल तर त्यात वर म्हटल्याप्रमाणे इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड व सोन्याचे प्रमाण अनुक्रमे ७५, २० व पाच टक्के असू शकते. मात्र यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते. या प्रकारे गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षाने शेअर बाजार वधारला तर इक्विटी म्युच्युअल फंडाचे मूल्य ८० टक्क्यांवर जाण्याची शक्यता असते. अशावेळी ही वाढीव युनिट्स विकणे किंवा डेट फंडात वळवणे योग्य ठरते. कारण, भविष्यात निर्देशांक कोसळला तर पूर्वी ८० टक्क्यांवर असलेल्या इक्विटीचे मूल्य एका रात्रीत कितीतरी घटू शकते व मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे मालमत्ते वर्गीकरणाचे प्रमाण संतुलित राखणे नेहमीच आवश्यक असते.

मालमत्ता वर्गीकरणाचे फायदे काय असतात?

शेअर बाजाराचा निर्देशांक हा कधी, किती वरखाली होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे निर्देशांकातील चढउतारांची आपल्या पोर्टफोलिओला झळ बसू द्यायची नसेल तर मालमत्ता वर्गीकरणासारखा उपाय नाही. हे तत्त्व पाळल्यास गुंतवणूकदाराला चांगला परतावाही मिळतो व आर्थिक उद्दिष्ट गाठता येते.

मालमत्ता वर्गीकरणाचा आढावा किती अंतराने घ्यावा?

मालमत्ता वर्गीकरण केल्यानंतर हा विषय संपत नाही. आपल्या मालमत्ता योग्य प्रमाणात मूल्य राखून आहेत की नाही, हे पाहाणे अत्यावश्यक असते. साधारण दर तीन महिन्यांनी मालमत्ता वर्गीकरणाचा आढावा घ्यावा, असा सल्ला अर्थ नियोजक देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>