Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

वाटचाल पुनर्विकासाच्या दिशेने

$
0
0

- गणेश आचवल

शंभरी पार केलेल्या जुन्या बदामवाडीला आता नव्याकोऱ्या विकासाचे वेध लागले आहेत.

शतकाच्या खुणा जाणवणाऱ्या बऱ्याच वसाहती खरंतर दक्षिण मुंबईत आहेत. लॅमिंग्टन रोडवरून चालत आलात की इम्पिरिअल चित्रपटगृहासमोरच्या गल्लीत प्रथम श्रीसाईधाम मंदिर लागते आणि तिथून पुढे काही इमारती सोडल्यावर पुढे दिसते ती बदामवाडी.

बदामवाडीचा पत्ता हा जुनी बदामवाडी, ३९१, मारवाडी चाळ असा असून तो तिथल्या प्रवेशापाशी असलेल्या दगडी भिंतीवर कोरलेला दिसतो. या वाडीत पाच इमारती असतील याची बाहेरून कल्पनाही येत नाही. इथे खूप शांतता जाणवते. इथे 'ए'पासून 'ई'पर्यंत पाच चाळी आहेत. जगदीश शहा हे या चाळींचे पूर्वीचे मालक होते, असं इथले रहिवासी सांगतात.

इथली 'ए' ही इमारत 'बंगली' नावाने ओळखतात. तिची रचना तळमजला अधिक एक मजला अशी असून इथल्या घरांचं क्षेत्रफळ हे २०० चौ.फूट आहे. तळमजल्यावर काही दुकानं आहे आणि वरच्या मजल्यावर दोनच मराठी कुटुंबं राहतात. 'बी' इमारतीची रचना पूर्वी तळमजला अधिक दोन मजले अशी होती. आता या इमारतीचा फक्त तळमजला राहिला आहे. वरचे दोन मजले पाडण्यात आले असून इथल्या रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.

'सी' इमारत ही तळमजला अधिक एक मजला अशी छोटेखानी आहे. 'डी' इमारतीत तळमजला आणि वर दोन मजले अशा रचना असून इथली घरं ११० चौरस फुटांची आहेत. या इमारतीत एकूण १२ कुटुंबं असून ती सर्व कुटुंबं मराठी आहेत . या जुन्या बदामवाडीतली मोठी चाळ म्हणजे इमारत क्रमांक 'ई'. तळमजला आणि वर तीन मजले अशी या इमारतीची रचना आहे. या इमारतीत लाकडी आणि लोखंडी असे दोन्ही प्रकारचे जिने आहेत. वर्तुळाकार लोखंडी जिने हे या चाळीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. तळमजल्यावर फक्त दुकानंच आहेत. उर्वरित तीन मजल्यांवर एकूण २४ कुटुंबं राहतात. या इमारतीमध्ये मराठी आणि मारवाडी अशी मिश्र वस्ती असून ते अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत. इथल्या घरांची क्षेत्रफळं साधारणपणे २०० चौरस फूट आहेत. इथल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ६८ वर्षं पूर्ण झाली आहेत. या वाडीत मारुतीचेही मंदिर असून इथे हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो. राजकारण आणि समाजसेवेत सक्रिय सहभाग असणारे गजानन वर्तक इथले रहिवासी होते. तसेच मुंबई रणजी क्रिकेटमधले दीपक जाधव आणि जयप्रकाश जाधव हेदेखील इथलेच रहिवासी. आता या चाळी खासगी विकासकाने विकत घेतल्या असून पुनर्विकासाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>