Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

पैसा झाला मोठा कॉलम

$
0
0

'पैसा झाला मोठा''

थकबाकीपोटीच्या उत्पन्नाला प्राप्तिकरात सवलत

१) माझा एक मित्र एका विद्यापीठाचा सेवानिवृत्त अधिकारी आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्याला ३,७५,००० रुपये निवृत्ती वेतन मिळाले. तसेच, जुन्या वेतन निर्धारणानुसार त्याला २००७ ते २०१७ या कालावधीतील अॅरिअर्सपोटी ३,५२,००० रुपये मिळाले. म्हणजेच, गेल्या आर्थिक वर्षात त्याचे एकूण उत्पन्न ७,२७,००० रुपये झाले. अॅरिअर्सची रक्कम ही १० वर्षांपूर्वीची असूनही विद्यापीठाने त्याचे वर्षवार विवरण दिलेले नाही. ही अतिरिक्त रक्कम गेल्या आर्थिक वर्षाच्या करासाठी ग्राह्य धरल्यास विनाकारण अधिकचा कर आकारला जाऊ शकतो. अशा स्थितीत त्याने काय करावे याविषयी कृपया माहिती द्यावी.

आणखी एक शंका... आमच्या एका नातेवाईकाचे रुग्णालयातील उपचारांवर दीड लाख रुपये खर्च झाले. आरोग्यविम्यापोटी त्यांना ५० हजार रुपयांचा क्लेम मिळाला. उर्वरित एक लाख रुपयांच्या खर्चावर त्यांना प्राप्तिकरात सवलत मिळेल का, याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

- एक वाचक, इंदूर

तुमच्या मित्राकडे त्यांना मिळालेल्या अॅरिअर्सचा १० वर्षांतील हिशेब असेल तर त्यांना कलम ८९(१) अंतर्गत सवलत मिळू शकेल. परंतु त्यांच्याकडेही हा तपशील नसेल व विद्यापीठही तो देऊ शकत नसेल तर त्यांचे हे उत्पन्न चालू वर्षाचे ग्राह्य धरले जाईल व त्यानुसार करआकारणी होईल. अशा स्थितीत त्यांनी विवरणपत्र भरताना सीएचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

प्राप्तिकर कायद्यानुसार काही विशिष्ट आजारांवरील उपचारांसाठी करातून सवलत मिळते. तुमच्या प्रश्नामध्ये आजाराचा नेमका उल्लेख नसल्याने सीएचा सल्ला घ्यावा.

२) मी एक ज्येष्ठ नागरिक असून दरवर्षी प्राप्तिकराचे विवरणपत्र भरतो. मी एका सहकारी बँकेचा भागधारक आहे. मला आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये या बँकेकडून लाभांश मिळाला. हा लाभांश माझ्या एकूण उत्पन्नाचा भाग आहे काय, लाभांशाचे हे उत्पन्न करपात्र ठरेल काय? अथवा हा लाभांश करमुक्त आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

- एकनाथ कठाळे, नागपूर

सहकारी बँकांना डिव्हिडण्ड डिस्ट्रिब्युशन टॅक्स भरणे बंधनकारक नसल्याने सहकारी बँकांकडून मिळणारा लाभांश हा करपात्र असतो. त्यामुळे तुमच्या अन्य उत्पन्नात लाभांशाची रक्कम समाविष्ट करावी लागेल व त्यानंतर एकत्रित उत्पन्नावर प्राप्तिकर मोजता येईल.

३) मी एक ज्येष्ठ नागरिक असून मला निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त घरभाडे, शेअर्स व म्युच्युअल फंड आदी माध्यमातून उत्पन्न मिळते. प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्यासाठी मी कोणता अर्ज भरण्याची गरज आहे, तसेच पीपीएफ, शेअर्स व म्युच्युअल फंडाचा लाभांश या विवरणपत्रात कुठे व कसा दाखवावा, याचे कृपया मार्गदर्शन करावे.

- एक वाचक, पुणे

तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त घरभाडे आणि शेअर्स व म्युच्युअल फंड आदींतून मिळणारा भांडवली नफा समाविष्ट असल्याने तुम्हाला आयटीआर-टू हा अर्ज भरावा लागेल. तुम्हाला मिळणारे पीपीएफचे व्याज, शेअर्स व म्युच्युअल फंडाचा लाभांश हे करमुक्त असतात. विवरणपत्रात करमुक्त उत्पन्नाची माहिती देण्यासाठी असणाऱ्या रकान्यांमध्ये या तिन्ही उत्पन्नांची नोंद करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>