Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

शोभिवंत स्टोन्स

$
0
0

- टीम टाइम्स प्रॉपर्टी

किचनपासून गार्डनपर्यंत सर्वत्र डेकोरेशनसाठी स्टोन्सचा वापर केला जात आहे. कमी किमतीत सुंदर डेकोरेशनचा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. केवळ उच्चवर्गीयच नाही, तर मध्यमवर्गीयही या ट्रेण्डचा वापर करताहेत.

घर सजवण्यामध्ये आजकाल प्रत्येकजण काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यातल्या त्यात कल असतो तो नैसर्गिक साधनसामुग्रीकडे. या ट्रेण्डमध्ये सध्या जास्त मागणी आहे, ती विविध प्रकारच्या स्टोन्सना. किचनपासून गार्डनपर्यंत सर्वत्र डेकोरेशनसाठी स्टोन्सचा वापर केला जात आहे. कमी किमतीत एक सुंदर डेकोरेशनचा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे.

आजकालच्या चकचकीत जमान्यात दगडांनी घर सजवायचं ही कल्पना नव्हे, तर वाक्यच रूक्ष वाटतं; पण क्रिएटिव्हिटी ही गोष्टच अशी आहे, ज्यामुळे हे दगडही आज गृहसजावटीचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. कलरफुल स्टोन्सच्या माध्यमातून आज गृहसजावटीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं जात आहे. लहान-मोठ्या आकारातले हे रंगीबेरंगी दगड सजावटीला नैसर्गिक लूक तर देतातच; शिवाय कलरफुल वातावरणही तयार करतात.

आकार आणि रंगांच्या कॉम्बिनेशननुसार हे स्टोन्स डेकोरेशनसाठी कसे वापरायचे हे ठरवलं जातं. किचनमध्ये पिण्याच्या पाण्याचं स्टोरेज खाली असेल, तर त्याच्या बाजूने आकाराने मध्यम असलेल्या स्टोन्सचा वापर करून डिझाइन केली जाते. फरशीच्या रंगावर उठून दिसतील असे स्टोन्स यासाठी वापरले जातात. लिव्हिंग रुममध्ये तर अनेक ठिकाणी या स्टोन्सचा वापर केला जातो. फ्लॉवर पॉटमधल्या फुलांच्या रंगांचे स्टोन्स फ्लॉवरपॉटच्या बाजूने पसरले जातात. याचबरोबर शो-पीस म्हणूनही हे विविध रंगाचे आणि आकारातले स्टोन्स लिव्हिंग रूममध्ये वापरले जातात. टीव्ही युनिटच्या काचेखाली किंवा भिंतीत फिक्स केलेल्या शो-पीस स्टॅण्डवरही हे स्टोन्स शोभून दिसतात.

या रंगीबेरंगी स्टोन्सचा सगळ्यात जास्त वापर केला जातो, तो म्हणजे गार्डनमध्ये. कुंड्यांच्या बाजूला हे स्टोन्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. तसंच, कुंड्यांमध्येही अनेकदा हे स्टोन्स टाकले जातात. कुंड्या टेरेसमध्येच असतील, तर फरशीच्या कॉण्ट्रास्ट रंगामध्ये हे स्टोन्स वापरले जातात. याचबरोबर लॉनमध्येही यांचा वापर केला जातो. केवळ डेकोरेशन म्हणूनच नाही, तर गार्डनमधली एखादी लहानशी पोकळी भरून काढायची असल्यासही या स्टोन्सचा आकर्षकरित्या वापर केला जातो. माती, सिमेंट किंवा मुरुमापेक्षा हे रंगीबेरंगी स्टोन्स खूपच आकर्षक दिसत असल्यामुळे गार्डनलाही सुंदर लूक मिळतो.

या स्टोन्सची सजावटीमधली वाढती मागणी लक्षात घेऊन आजकाल गिफ्ट शॉप्समध्ये तसंच शो-पीस हाऊसमध्येही हे स्टोन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर शहराबाहेर संगमरवरी किंवा विविध प्रकारच्या दगडातल्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांकडेही हे स्टोन्स मिळू शकतात. रंग, आकार आणि फिनिशिंग यानुसार या स्टोन्सचा दर ठरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>