Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

रेरा प्राधिकरणाकडे प्रकल्पनोंदणी बंधनकारक

$
0
0

प्रश्न

आमच्या सोसायटीत ४५ सभासद आहेत. आम्ही गेल्यावर्षी आमच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी एक विकासक नेमला व त्याच्याबरोबर करारनामा करून रजिस्टर केला. आता रेरा कायद्यांतर्गत आमचा विकासक रेरा रजिस्टर्ड असणे आवश्क आहे का? विकासकाचे म्हणणे असे आहे, की मला रेरा रजिस्ट्रेशन करणे आवश्क नाही. योग्य ते मार्गदर्शन करावे, ही विनंती.

उत्तर

रेरा कायद्यात स्पष्ट केल्यानुसार, प्रवर्तकाने आपला प्रकल्प रेरा प्राधिकरणाकडे नोंदवल्याशिवाय तो त्या प्लॉट, इमारत, फ्लॅटची जाहिरात, विक्री, पणन, विक्री प्रस्ताव अथवा खरेदीसाठी ग्राहकांना आमंत्रित करू शकत नाही. या कायद्यात ज्यांना पूर्तता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांचाही समावेश करण्यात आला आहे. तथापि, वर नमूद केलेल्या सर्वसाधारण नियमाला काही अपवाद आहेत. जर बांधकाम प्रकल्पात आठ किवा आठपेक्षा कमी फ्लॅट असतील, तर त्याला रेरा मध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नसते. तसेच, ज्यात पणन, जाहिरात, विक्री अथवा नवी नोंदणी नसलेल्या पुनर्विकास प्रकल्पालाही रेरामध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. जर तुमची पुनर्विकास योजना या अपवादात मोडत असेल, तर बिल्डरला रेरामध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अन्यथा नोंदणी करायलाच हवी.


प्रश्न

आमची ११२ सदस्यांची सोसायटी आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभांमध्ये गणसंख्या नेहमीच जेमतेम असते. अनुपस्थित सभासदांना दंड लावता यावा, असा ठराव सर्वसाधारण सभेत संमत करता येईल का? तशी तरतूद उपविधीत आहे का?

- किरण गायकवाड

उत्तर

सोसायटीच्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल दंड ठोठावण्याचा सोसायटीला अधिकार देणाऱ्या कोणत्याही कायद्यातील तरतुदींची मला कल्पना नाही. तथापि, आदर्श उपविधीमध्ये सक्रीय आणि निष्क्रीय सदस्यांतील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत सलग एकाही सर्वसाधारण सभेस उपस्थित न राहणारा सदस्य हा निष्क्रिय मानला जातो. त्याला निष्क्रीय सदस्य म्हणून वर्गीकृत केल्यानंतरच्या पाच वर्षांत त्याने एकाही बैठकीला उपस्थिती नाही दाखवली तर त्याचे सोसायटीचे सदस्यत्व रद्द करता येते. निष्क्रिय सदस्य सोसायटी कमिटीच्या निवडणुकीलाही उभा राहण्यास पात्र नसतो.


प्रश्न

सोसायटीने जारी केलेले आमचे भाग प्रमाणपत्र, शेअर सर्टिफिकेट गहाळ झाले आहे. आम्ही सोसायटीकडे डुप्लिकेट शेअर्स सर्टिफिकेट साठी विनंती करू शकतो का?

- रमेश मोहिते

उत्तर

तुमच्या शेअर सर्टिफिकेटची मूळ प्रत हरवली असेल, तर सोसायटीने तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. सोसायटी तुमच्याकडे काही गोष्टींचा आग्रह धरू शकते. या संदर्भात तुम्ही शेअर सर्टिफिकेट हरवल्याची पोलिस तक्रार नोंदवल्यास उत्तम. हरवलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेटचा कोणी गैरवापर करू नये या हेतूने प्रतिबंधक उपाय म्हणून सोसायटीला क्षतिपूर्ती बंधपत्र (indemnity bond) देऊ शकता.

‘हाऊसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न

‘हाऊसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठवताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाऊसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>