Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

फ्लॅटवर मालकी हक्क सर्व मुलांचा

$
0
0

प्रश्न

आम्ही चार भावंडे - दोन भाऊ आणि दोन बहिणी. आमच्या वडिलांनी स्वकमाईतून घेतलेले एक घर आहे. वडिलांनी आईच्या नावे नॉमिनेशन केले होते. वडिलांच्या पश्चात आईचे नाव शेअर सर्टिफिकेटवर लावले गेले. आईने दोन्ही मुलांच्या नावे नॉमिनेशन केले व तिच्या नंतर त्या दोन्ही मुलांचे नाव शेअर सर्टिफिकेटवर लावले गेले आहे. त्या घरावर चौघांचा अधिकार असेल की ज्यांच्या नावावर शेअर सर्टिफिकेट सोसायटीने केले आहे त्या फक्त दोन मुलांचा?.

- एक वाचक

उत्तर

तुमच्या प्रश्नावरून असे दिसते, की सदरच्या फ्लॅटसाठी तुमच्या आईने इच्छापत्र मागे ठेवलेले नाही; केवळ दोन मुलांना वारस म्हणून नोंदले आहे. तसे असेल तर या फ्लॅटवर हक्क, अधिकार आणि मालकी सर्व, चारही मुलांकडे जाईल, केवळ दोन वारस म्हणून नोंदलेल्यांकडे नव्हे. सोसायटीने वारस म्हणून नोंदलेल्यांना सोसायटीचे सदस्यत्व बहाल करून योग्यच गोष्ट केली आहे. पण त्यामुळे या एका गोष्टीमुळै या दोघांपुरती त्याची मालकी मर्यादित राहात नाही.

अविवाहितांना फ्लॅट भाड्याने न देण्याची सक्ती चुकीची

प्रश्न

सोसायटीचे सदस्य म्हणतात, मी बॅचलर भाडेकरू ठेवू शकत नाही. हे योग्य आहे का? असा निर्णय ते घेऊ शकतात का? अजून सोसायटी रजिस्टर्ड झालेली नाही. माझ्या फलॅटबाबत सोसायटी निर्णय घेऊ शकते का?
- महादेव गांवकर

उत्तर

नोंदणी न झालेली सोसायटी ही कायद्याच्या नजरेतून सोसायटी अजिबात नाही त्यामुळे त्याने केलेले नियम पाळण्यास फ्लॅट खरेदीदार बांधील नाही. नोंदणीकृत सोसायटीदेखील सदस्यावर अविवाहितांना फ्लॅट भाड्याने न देण्याची सक्ती करू शकत नाही. ताज्या उपनियमांनुसार सदस्याने सोसायटीला आठ दिवस आधी ते आपला फ्लॅट भाड्याने देत असल्याची सूचना देणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. आपला फ्लॅट आपल्या पसंतीच्या व्यक्तीला भाड्याने देण्याचा अधिकार सदस्याला आहे आणि त्याला तसेच मोठे कारण असल्याशिवाय सोसायटी कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. उपनियम ४७ मध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रत्येक सदस्य नैतिकता, सभ्यता याला बाधा येण्याजोगे किंवा इतर सदस्यांसाठी उपद्रव, त्रास किंवा गैरसोय होईल असे काणतेही कृत्य करणार नाही, करू देणार नाही. सदस्यांवर लादलेल्या या मर्यादा भाडेकरूंनाही लागू आहेत, अविवाहितांसह. जर भाडेकरूंनी इतरांना उपद्रव केला किंवा गैरवर्तन केले तर सोसायटी संबंधित सदस्याला भाडेकरार रद्द करण्यास आणि भाडेकरूस बाहेर काढण्यास सांगू शकते. मात्र अविवाहित भाडेकरू उपद्रव करतील किंवा गैरवर्तन करतील असे आधीच गृहित धरू शकत नाही आणि म्हणून भाड्यावर देण्यास आक्षेप घेऊ शकत नाही.

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाउसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>