Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

योग्य आर्किटेक्ट निवडा

$
0
0

प्रश्न

डोंबिवली येथील सहकारी गृह संस्थेचे आम्ही सभासद असून चांगल्या, नामवंत विकासकामार्फत सोसायटीच्या इमारतीचा पुनर्विकास करावयाचे आम्ही ठरवले आहे. आमच्या प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ १३५० चौरस मीटर आहे. जमीन फ्री होल्ड असून कन्व्हेयन्स झाले आहे तसेच ७/१२वर सोसायटीचे नाव आहे. सोसायटीनजीक तीन मीटर रुंदीचा अप्रोच रोड असून प्रस्तावित नऊ मीटर मुख्य रस्त्यापासून ५० फूट अंतर आहे. सोसायटीच्या एकूण तीन इमारती असून दोन तळमजला+तीन मजले आणि एक तळमजला+दोन मजले अशा आहेत. इमारती १९९१ साली बांधल्या आहेत. एकूण ३६ सदनिका व सोसायटीचे कार्यालय आहे. सदनिका ३४० ते ६७५ चौरस फूट अशा वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.

- जी. एन. कोल्हे

उत्तर

सहकार खात्याने ७९(अ) अन्वये सविस्तर नियमावली दिली आहे. त्यात कसा पुनर्विकास करावा, आर्किटेक्ट नेमणे इत्यादी सर्व गोष्टींची सुयोग्य माहिती आपणास मिळेल. त्याचा अभ्यास केल्यावर पुनर्विकास करावा याची माहिती आपणास मिळेल. डोंबिवली शहराच्या संदर्भात पुनर्विकासाबाबत परवानग्या मिळणे अलीकडेपर्यंत थोडे त्रासदायक होते. अलीकडे होऊ घातलेल्या नियमांत पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय देण्याचे मान्य झाले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली आहे किंवा झाली आहे किंवा नाही याविषयीची माहिती आपण घ्यावी व त्या अनुषंगाने पुढील वाटचाल करावी. आपल्याला जर अडीच एफएसआय मिळाला, तर आपणास ३३७५ चौरस मीटर इतके क्षेत्रफळ मिळेल. त्यावर मोठी घरे बांधता येतील व देखभालखर्चासाठी कॉर्पस निधीही मिळवता येईल. आपल्या सोसायटीत किती सदनिका ३४० आणि किती ६७५ चौरस फुटांच्या आहेत याचे नेमके तपशील मिळाले असते, तर अधिक नेमकी माहिती देता आली असती. योग्य आर्किटेक्ट निवडावा, कायदेशीर सल्ला घ्यावा व पुनर्विकास करावा.

‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न

‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न पाठवताना पुढील तपशील देणे अत्यावश्यक आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागू आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत की अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा. प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत. पाकिटावर ‘पुनर्विकास सदरासाठी’ असा स्पष्ट उल्लेख न चुकता करावा. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>