पुनर्विकासाच्या प्रक्रियेत टप्प्याटप्यावर अनेक समस्या उभ्या राहतात आणि त्यांना सामोरं जाणं अनिवार्य असतं. पुनर्विकासाची प्रक्रिया ही मुळातच खूप क्लिष्ट असते. कारण त्यात बऱ्याच प्रकारची कागदपत्रं, करार आणि तत्सम गोष्टी पुरवाव्या लागतात.
कोणत्याही गोष्टीत अज्ञानी राहू नये असं म्हणतात. त्यातही रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत अज्ञानी राहूच नये. तेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं तर आयुष्यभराच्या मिळकतीची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. घर खरेदीदार, घरमालक, भाडेकरू यांचं प्रमाण वाढत असल्यामुळे घरांच्या गरजाही वाढत आहेत. त्यामुळे अनेकदा कायद्यांना बगल देऊन नवनवीन टॉवर्स उभे राहत आहेत. पण जेव्हा या सर्व गोष्टी समोर येतात तेव्हा मात्र विलंबाशिवाय आपल्या हातात काही राहत नाही. आपल्या हातात राहते ती फक्त निराशा आणि नुकसान. पुढील निकषांनुसार जुन्या इमारतींचा पुर्नविकास केले तर ते नक्की यशस्वी होऊ शकतं.
आवर्ती चुका
ज्या इमारती कोणत्याही प्रकारची चौकशी न करता एखाद्या बिल्डरची निवड करून आधीचे जुने करार रद्द करत नाहीत आणि इतर करार करण्यात व्यर्थ वेळ घालवतात या सर्व रहिवाशांची एकच गत होते ती म्हणजे त्यांना योग्य वेळी त्यांची घरं मिळत नाहीत. आपल्या प्रकल्पाद्दल सखोल ज्ञान नसल्याने बरेचदा रहिवाशी चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू करतात जिथून परतीचा मार्ग नसतो. याच्या अगदी उलट जे रहिवाशी सर्व प्रकारची माहिती गोळा करून मग सर्व कामं आधी ठरवून दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे कामं करतात त्यांची कामं सुरळीतपणे पार पडतात.
अनेक समस्या
पुनर्विकासाच्या प्रक्रियेत टप्प्याटप्यावर अनेक समस्या उभ्या राहतात आणि त्यांना सामोरं जाणं अनिवार्य असतं. पुनर्विकासाची प्रक्रिया ही मुळातच खूप क्लिष्ट असते. कारण त्यात बऱ्याच प्रकारची कागदपत्रं, करार आणि तत्सम गोष्टी पुरवाव्या लागतात. शिवाय काही बाह्य गोष्टींमुळेही यात अडथळे निर्माण होतात. उदाहरणार्थ हवामान, नैसर्गिक आपत्ती या गोष्टींमुळे सुद्धा ठरलेलं वेळापत्रक बदलावं लागतं. या बाह्य अडथळ्यांचा सर्वात जास्त त्रास होतो त्या रहिवाशांना ज्यांची घरं पुनर्विकासनाला गेली आहेत. जसजसे पुनर्विकासाचं वेळापत्रक पुढे ढकललं जातं तसं त्यांना भाड्याच्या घरात राहणं किंवा पर्यायी जागा शोधणं अनिवार्यच ठरते.
पुनर्विक्रीचा प्रस्ताव
सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असणारं नवं घर घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्या घराची निवड कराल? अशी इमारत जी जुनी असूनसुद्धा अद्याप मजबूत आहे आणि बाहेरूनही ती इमारत सुंदर दिसते अशी की रंग उडून गेलेल्या, प्लॅस्टर पडणाऱ्या किंवा गळतीची सतत तक्रार असणाऱ्या इमारतीची निवड कराल? तसंच तुम्ही कोणत्या प्रकारच्या प्रकल्पाची निवड कराल? ज्यातला एखादा फ्लॅट पुन्हा विकायला काढला तर त्याची किंमत मूळ किमतीपेक्षा जास्त येईल अशा की तुमचे शेजारी मूळ किमतीपेक्षाही कमी किंमत घेऊन तिथून बाहेर पडण्याची घाई करत असतील, अशा इमारतीत?
चांगल्या भविष्यासाठी आणि मोठ्या घरात राहण्याची योजना आखत असाल तर योग्य वेळेतच इमारत पुनर्विकासासाठी जाणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या घराला सहजपणे खरेदीदार मिळू शकतो आणि त्याची रक्कमही चांगली मिळू शकते.
पुनर्विकासाचा मंत्र
नामांकित विकासक त्या जागेला एका उच्च स्तरावर पोहोचवण्याची दृष्टी ठेवतो जेणेकरून त्या जागेचं रूपांतर एका प्रतिष्ठित वास्तूमध्ये होईल. नामांकित ब्रँड तुमची इमारती सुसज्ज कशी होईल आणि परिसरात त्याला एक स्वतंत्र ओळख कशी निर्माण करेल याकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे तुमच्या इमारतीला महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे भविष्यात तुम्हाला दुसऱ्या शहरात जायचं झालं तरी कोणत्याही दुय्यम विकासकाने किंवा कंत्राटदाराने बनवलेल्या घरांपेक्षा तुमच्या घराला चांगली किंमत मिळू शकते.
नावाजलेले विकासक तुम्हाला तुमच्या परिसरातच उत्तम राहणीमान कसं मिळू शकेल याची कल्पना देऊ शकतात.
सध्याच्या काळात पुनर्विकास हा एक आदर्श पर्याय आहे. कारण तुमची ४० ते ५० वर्षं जुनी इमारत पाडून तिथे
नवीन स्वरूपाची इमारत बांधणं गरजेचं आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे नवीन आकर्षक रचना घडवून आणता येते. सतत इमारतीची दुरूस्ती करण्यापेक्षा पुनर्विकास करणं फायद्याचं ठरतं.
या गोष्टींची खात्री नक्की कराः
विकासकाच्या गुणात्मक पैलूंकडे लक्ष द्या.
त्याच्या मागच्या पुनर्विकासाचा अनुभव
पुनर्विकास प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण केला का?
बांधकाम गुणवत्ता आणि सुविधांचं दिलेलं वचन पूर्ण केलं का?
विकासकाने आधी केलेल्या किमान दोन ते तीन इमारती प्रकल्पांचा आढावा घ्यावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट