Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

सहयोगी सदस्यांची इच्छा महत्त्वाची

$
0
0

मी मिरा रोड येथील मेघ:शाम दर्शन गृहनिर्माण सहकारी सोसायटीचा सदस्य असून माझ्या सोसायटीत ए, बी, सी, डी अशा प्रत्येकी ४२ फ्लॅट्सच्या विंग्स आहेत. ए विंगमध्ये रस्त्याच्या बाजूने १५ दुकाने आहेत. एकूण क्षेत्रफळ ९६३० चौरस मीटर असून एकूण सात मजले आहेत. प्रत्येक विंग मध्ये १४ फ्लॅट्स एक बेडरूमचे (५६० चौ. फूट) तर २८ फ्लॅट्स दोन बेडरूमचे (८३५ चौ. फूट) आहेत. दुकाने प्रत्येकी २०० चौ. फुटांची आहेत. आम्ही डीम्स कन्व्हेयन्ससाठी अर्ज केलेला आहे. आमच्या सोसायटी कमिटीत ८ सहयोगी सदस्य आहेत. सर्वसाधारण गटात दोन जागा रिक्त असून काही सदस्य कमिटीत येऊ इच्छित आहेत. त्यासाठी काय पद्धत आहे? कारण सोसायटीच्या उपनियमांत त्याबद्दल सुस्पष्टता नाही. मी स्वतः २००४ ते २०१० पर्यंत सदस्य होतो तर २००७ ते २०१० दरम्यान अध्यक्ष होतो. सध्या मी कन्व्हेयन्स कमिटीचा अध्यक्ष आहे. कृपया सहयोगी सदस्याच्या अधिकाराबद्दल सुस्पष्टता द्यावी.

- जयंत देवस्थळी

उत्तरः

सहयोगी सदस्य निवडणूक लढवून पदाधिकारीही बनू शकतात, मात्र त्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या सदस्यांनी या प्रक्रियेत रस नसल्याचे स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणतः सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सहभागी होणे, मतदान करणे, निवडणूक लढवणे आणि पदाधिकारी बनणे हे शेअर सर्टिफिकेटवर पहिले नाव असलेल्यांचा अधिकार असतो. जर या व्यक्तीने वरील व्यवहारांत रस नसल्याचे अथवा काही कारणास्तव सहभागी होऊ शकत नसल्याचे सोसायटीला कळवल्यास हा अधिकार शेअर सर्टिफिकेटवरील दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला जातो. अन्य कोणत्याही सदस्यांप्रमाणेच याही सदस्याला सोसायटीचे कायदे आणि उपनियम लागू होतात हे सांगणे न लगे. अशा परिस्थितीत जर तुमची सोसायटी आपल्या कमिटीत आठ सहयोगी सदस्यांपैकी दोघांना स्वीकृत सदस्य म्हणून घेऊ इच्छित असेल तर तसे खुशाल करू शकते.

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाउसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>