Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

‘कन्व्हेयन्स’ ही विकासकाची जबाबदारी

$
0
0

आमच्या सोसायटीचे ‘कन्व्हेयन्स डीड’ अजून झालेले नाही. इमारत ५ वर्षे जुनी असून सोसायटीला देखभाल हस्तांतरण वगैरे झाले आहे. एकच इमारत असून २२ सभासद, ३ दुकाने आणि १८ सदनिका अशी ही पूर्व उपनगरातील सोसायटी आहे. बिल्डरला कन्व्हेयन्स डीड करण्यास सांगितल्यावर त्याने पुढील कागदपत्रांची मागणी केली आहेः १)सोसायटी रजिस्ट्रेशनच्या प्रमाणपत्राची प्रत, २) विकासकासोबत सभासदांच्या झालेल्या करारपत्राची प्रत, पुनर्विक्री झाली असल्यास प्रत्येक करारपत्राची प्रत, ३) इंडेक्स २ची प्रत, ४) शेअर सर्टिफिकेटची प्रत, ५) प्रॉपर्टी कार्डची प्रत(३ महिन्यांपर्यंत किंवा त्यानंतरची लेटेस्ट), ६) प्रॉपर्टी टॅक्सचे बिल आणि ताजी पावती प्रत, ७) सोसायटीच्या पॅन कार्डची प्रत, ८) निवडून आलेल्या सभासदांची नावे व संबंधित सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत आणि ९) सध्याच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांची नावे. माझा प्रश्न असा, की या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असते का किंवा नेमकी कोणती कागदपत्रे हवी असतात? प्रॉपर्टी कार्ड आमच्याकडे नाहीत, त्याबाबत काय करणे आवश्यक आहे?

- प्रमोद जगतियानी, चेंबूर, मुंबई

कन्व्हेयन्स करण्यासाठी म्हणून बिल्डरने तुमच्याकडून जी कागदपत्रे मागितली आहेत, त्यांची यादी पाहता त्याला आपल्या कायदेशीर जबाबदारीबद्दल पुरेशी कल्पना नाही, असेच म्हणावे लागेल. विशिष्ट कालावधीत कन्व्हेयन्स करून घेणे हे त्याचे कर्तव्यच असून या प्रक्रियेस तो विलंब लावत आहे, असे चित्र त्याने खरे तर उभे करता कामा नये. कन्व्हेयन्स हा पूर्णपणे सोसायटी आणि बिल्डर या दोहोंमधील मामला आहे आणि पैकी बिल्डर जर जमीन आणि इमारत यांचे हस्तांतरण सोसायटीस करण्याबाबत पुरेसा गंभीर असेल, तर ही प्रक्रिया विनासायास पार पडू शकते. बिल्डरने मागितलेले प्रत्येक कागदपत्र त्याला देणे सोसायटीला बंधनकारक नाही. जे कागदपत्र सोसायटीच्या विशेष कस्टडीमध्ये आहेत तेच बिल्डरला पुरवणे गरजेचे आहे, असे मी म्हणेन. सोसायटीच्या रजिस्ट्रेशन प्रमाणपत्राची नक्कलप्रत, पॅन कार्डाची नक्कलप्रत बिल्डरला देणे युक्त आहे. जर प्रॉपर्टी कार्डासारखे कागदपत्र सोसायटीकडे नसेल, तर ते मिळवणे हे बिल्डरचे कर्तव्य आहे. अशी काही कागदपत्रे नाहीत या सबबीखाली बिल्डर कव्हेयन्स लांबणीवर टाकू शकत नाही. आपल्यापाशी असलेली कागदपत्रे सोसायटी व तिच्या सभासदांनी जरूर द्यावीत, उरलेली मिळवणे हे बिल्डरचे कर्तव्य आहे.

‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न
‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठवताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाउसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>