‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ अशी इंग्रजीत म्हण आहे. तुम्ही तुमचं पहिलं इम्प्रेशन समोरच्यावर कसं पाडता यावरच बरंच काही अवलंबून असतं. हा नियम जसा सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्राला लागू आहे तसाच तो रिअल इस्टेट मार्केटलाही लागू पडतो. तुम्ही परिधान केलेला पोशाख हा तुमचा पहिला प्रभाव पाडण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही रिअल इस्टेट एजण्ट असाल तर तुमचा पोशाख हा टापटीप असणं फार गरजेच आहे.
एखाद्या जागेचा किंवा घराचा व्यवहार करत असताना तुम्हाला ग्राहकांबरोबरच विकासक, उच्च पदस्थ अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांबरोबर उठबस करावी लागते. अशा वेळी तुमचा पोशाख जर नीट आणि प्रसंगाला अनुसरून असेल तर तुम्हाला तुम्ही घडवून आणत असलेला व्यवहार सहज यशस्वी
करता यईल. तेव्हा रिअल इस्टेट एजण्टने मिटिंगला जाताना नेमका कोणता पोशाख घालावा यासंदर्भात खाली काही टिप्स…
फॉर्मल शर्ट
घर असो वा जागा, कुठल्याही प्रॉपर्टीसंदर्भातल्या मिटींगला जाताना फॉर्मल शर्टचा वापर करा. फॉर्मल सुट असेल तर फारचं उत्तम. परंतु सुट घेणं प्रत्येकाला शक्य असतच असं नाही. तेव्हा अशावेळी फॉर्मल शर्ट घातला तरी चांगलं इम्प्रेशन पडू शकतं. मिटींगसाठी गडद रंगाचा शर्ट घालायचं शक्यतो टाळा. तसंच शर्टावर वेगवेगळे डिझाईन्स असू नयेत. तो प्लेन असेल तर अधिक चांगलं. निळ्या, पांढऱ्या तसंच लाल रंगाच्या लाइट शेड्सचा वापर केव्हाही चांगलाच.
फुल पँट
फॉर्मल शर्टाबरोबरच तुम्ही कोणत्या प्रकारची पॅण्ट घालता हेही तितकंच महत्त्वाचं असतं. क्लायण्ट मिटींगला जाताना फुल पॅण्ट घाला. हाफ पॅण्ट, थ्रीफोर्थ ट्राऊझर्स चुकूनही घालू नका. शर्ट आणि शॉर्ट स्कर्ट हा फॉर्मल पोशाखाच भाग असला तरी शक्यतो महिलांनी प्रॉपर्टी मिटींगसाठी शॉर्ट स्कर्टचा वापर टाळावा. अशावेळी साडी किंवा पंजाबी ड्रेसचा वापर केला तरी फॉर्मल लूक येऊ येतो.
फॉर्मल शूज
शूज हा देखील तुमच्या पेहरावाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे रिअल इस्टेट एजण्टाने मालमत्तेसंदर्भातल्या मिटींगला जाताना फॉर्मल शूजच घालावेत. स्पोर्ट शूज किंवा स्लिपर्स वापरू नका. शूजला पॉलिश केलेलं असावं. महिलांनी हील्सचे शूज वापरावेत, परंतु जास्त मोठे हील्सचे शूजही वापरू नका, जेणे करून त्याचा त्रास होणार नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट