टीव्ही पाहणं असा वा पाहुण्यांचा पाहुणचार असो, गप्पा मारण्यासाठी त्यांना सोफ्यावरच बसवलं जातं. त्यासाठीच संपूर्ण घरात उठून दिसेल अशा सोफ्याचीच निवड केली तर हॉल अजून देखणा होईल. मोठ्या हॉलसाठी ८ व्यक्ती बसू शकतील असा सोफा उपयुक्त आहे. हे सोफे इंग्रजी ‘यू’ आणि ‘एल’ या आकारात उपलब्ध आहेत. या आकारांचा लाभ उठवत एकत्र बसून गप्पा मारण्याचा आनंद घेता येऊ शकतो. हॉल प्रशस्त नसला तरी छोटा, दोन व्यक्ती बसू शकतील असा आकर्षक सोफा, लिव्हिंग रूमला एक वेगळा लूक देतो. हॉलच्या आकारानुसार आणि रचनेनुसार दोन, तीन किंवा चार सीटर सोफे वापरता येऊ शकतात. या सोफा सेटमध्ये एक सोफा आणि दोन खुर्च्या असतात. त्यामुळे समोरासमोर आरामात बसता येतं. शक्यतो सोफा आणि खुर्च्या जवळ ठेवल्या तर गप्पा मारताना तुम्हाला जोरात बोलण्याची गरज लागणार नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट