घराचं डिझायनिंग करत असताना आता सीलिंगलासुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं. पूर्वी सीलिंगला फक्त पांढराच रंग दिला जायचा, घरातली कोणतीही रूम असो सीलिंग मात्र प्लेनच. पण सध्या हे सीलिंग घराच्या इंटेरिअरचा महत्त्वाचा भाग बनलं आहे. सीलिंगला फक्त रंग न देता त्याचं वेगळं आणि आकर्षक डिझाइन सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे.
हे डिझाइन करताना इंटिरिअर डिझायनरची मदत घेता येते किंवा स्वत:च्या कल्पनाशक्तीचाही वापर करता येतो. यामध्ये अनेक डिझाइन्स उपलब्ध असून आपल्या घरानुसार त्याचा वापर करता येऊ शकतो. हॉल, बेडरूम आणि किचनसाठीसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने सीलिंग डिझाइन करू शकतो. यामध्ये एलईडी लाइटचा वापर करून घराला खूप छान लूक देता येतो. एलईडी लाइटमध्येही अनेक पर्याय मिळतात. त्यामुळे आपल्या घराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सीलिंग डिझाइन खूप छान पर्याय आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट