ज्या भागाचा पूर्ण विकास झाला आहे किंवा होत आला आहे, अशा भागांऐवजी ज्या भागांचा विकास होत आहे तिथे घर घ्यावं. या प्रकल्पांमध्ये ग्राहकांना त्यांच्या पैशांचा पूर्ण मोबदला मिळू शकतो.
फर्स्ट होम घेणाऱ्यांना किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून छोट्या आकाराची घरं बांधण्यात येतात. छोट्या आकाराची घरं परवडणारी असतात, असा सार्वत्रिक समज आहे. पण वास्तविक त्यांचा दर खूप जास्त असतो. म्हणजे ती खूप महाग असतात. अशा घरांची विक्री होते कारण मोठ्या आकाराच्या घरांपेक्षा त्यांची किंमत कमी असते. पण छोट्या घरांसाठी ग्राहक ज्यादा दराने पैसे मोजतो.
गृहप्रकल्पामध्ये पुरेसा कॉमन एरिया सोडायला हवा. पण लहान आकाराच्या घरांच्या प्रकल्पांमध्ये ती बरेचदा सोडली जात नाही. याचा अर्थ असा की गृहप्रकल्प बांधताना सामाईक जागेसंदर्भात आणि विक्रीयोग्य क्षेत्रफळासंदर्भात जे नियम पाळायला हवेत ते पाळले जात नाहीत. अशी घरं फार फायद्याची नसतात. त्यामुळे विकासक त्यांच्या किमती वाढवतात.
बांधकामचा खर्च हा बांधकाम साहित्य किती प्रमाणात वापरलं आहे, यावर अवलंबून असतो. विकासक जेव्हा छोट्या आकाराची घरं बांधतो तेव्हा त्याला अधिक खर्च येतो. कारण घरं छोटी असली तरी त्यांना स्वतंत्र फिटिंग्ज, अप्लायन्सेस आणि फिनिशिंग लागतं. मग हा खर्च वसूल करण्यासाठी घरांचे दर वाढवले जातात.
अधिक घरं असलेल्या प्रकल्पात विकासकाची बरीच बचत होते. कारण त्यात कॉमन एरिया अधिक असतो. शिवाय फिटिंग्ज, अप्लायन्सेस आणि फिनिशिंग अधिक घरांसाठी असेल तर ते स्वस्त पडतं. म्हणूनच वन बीएचकेची किंमत ही टू बीएचकेपेक्षा केवळ ३० ते ३५ टक्क्यांनी कमी असते. तात्पर्य हे आहे की मोठ्या आकाराच्या घरांमध्ये ग्राहकांना पैशांचा अधिक मोबदला मिळतो.
लहान आणि मोठ्या आकारांच्या गृहप्रकल्पांची तुलना केली तरी मोठी घरं अधिक फायद्याची असल्याचं लक्षात येतं. मोठ्या घरांमध्ये कॉमन अॅमेनिटीज चांगल्या देण्याचा आणि तो प्रकल्प अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न विकासक करतात, पण लहान आकाराच्या घरांच्या प्रकल्पात अधिकाधिक फ्लॅट काढण्याचा प्रयत्न होतो. त्यात सुविधा देण्याचा किंवा तो अधिक आकर्षक करण्याचा पुरेसा प्रयत्न करत नाही.
अशी परिस्थितीत ज्या भागाचा पूर्ण विकास झाला आहे किंवा होत आला आहे, अशा भागांऐवजी ज्या भागांचा विकास होत आहे तिथे घर घ्यावं. या प्रकल्पांमध्ये ग्राहकांना त्यांच्या पैशांचा पूर्ण मोबदला मिळू शकतो.
इथले घरांचे दर सुरुवातीला तरी कमी असतात. याचा अर्थ असा की ग्राहकांना मोठ्या आकाराची घरं चांगल्या सेवासुविधांसह मिळू शकतात. शिवाय बांधकामांची संख्या वाढते तशा परिसरातल्या पायाभूत सुविधाही सुधारत जातात. त्यामुळे विकासाच्या मार्गावर असणाऱ्या भागांमध्ये घर घेणं केव्हाही फायद्याचंच ठरतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट