Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

सजावटीत साधा समतोल

$
0
0

- टीम टाइम्स प्रॉपर्टी

घराच्या सजावटीत केवळ श्रीमंत किंवा डिझायनर वस्तूंनी भरमार असून चालत नाही. त्यात सुसूत्रता असणंही आवश्यक आहे.

घराच्या सजावटीत सूसूत्रता असल्यास ही सजावट पाहणाऱ्याला आकर्षित करते, मनाला शांतता देते आणि घर या संकल्पनेला तुमच्या आणखी जवळ आणते. म्हणूनच घराच्या सजावटीत सूसूत्रता महत्त्वाची ठरते. घर कितीही श्रीमंत किंवा डिझायनर वस्तूंनी सजवून फायद्याचं नाही, तर त्यात सुसूत्रता असावी. त्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही. तुमच्या कल्पकतेला थोडा वाव दिलात, तर तुम्ही स्वतःही अशी सजावट करू शकता. त्यासाठी काही टिप्स...

समतोल गरजेचा

घरात कुठलीही सजावट करताना त्यात समतोल असणं गरजेचं आहे. कुठल्याही रूमची एक बाजू भडक किंवा जास्त सजावटीची दिसेल, असं करू नका.

सजावटीत समन्वय

भिंती, पडदे भडक रंगाचे आणि बटबटीत फर्निचर यानं सजावटीचा ताळमेळ साधला जाणार नाही. सजावटीतली प्रत्येक गोष्ट कल्पकतेने निवडा. या सगळ्या गोष्टींचा परस्परांशी समन्वय असणं गरजेचं आहे.

स्वच्छता

तुम्ही सजावटीसाठी कितीही आटापिटा केलात; पण घरात स्वच्छता नसेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एकवेळ सजावट नसली तरी चालेल; पण घर, त्याचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असायला हवा. जाळी-जळमटं, धूळ, काचांची सफाई, फरशी या गोष्टींची नियमितपणे स्वच्छता व्हायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>