Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

कसं असतं ग्रीन होम; जाणून घ्या प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा मार्ग

$
0
0

मुंबई : लोकांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग विषयीची जागरूकता वाढत आहे आणि ग्रीन, इकोफ्रेण्डी, सस्टेनेबल आदी शब्द सर्वच ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. कोविड-१९ मुळे झालेल्या टाळेबंदीने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या. आपलं घर हे नुसतं घर नसावं, ते एक मनोरंजनाचं केंद्रही असलं पाहिजे, याची जाणीव टाळेबंदीनेच करून दिली. त्यामुळे हिरवाई, प्रदूषणमुक्त वातावरण, भरपूर मोकळीजागा, पुरेसा नैसर्गिक प्रकाश, खेळती हवा उपलब्धकरून आपल्यात सुरक्षेची भावना निर्माण करणारं घर असावं, असं कुणाला वाटलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. सध्याची परिस्थिती बघता ग्रीन लक्झरी होमची संकल्पना रूढ होण्यास फार वेळ लागणार नाही. नैसर्गिक सहवास, सदृढ जीवन, तसंच ऊर्जेचा कार्यक्षम वापर, कमीत कमी विषारी उत्पादनांचा उपयोग आणि शाश्वत कच्च्या मालाचा अंगिकार केलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात बांधलेल्या घरात राहणं, आदी गोष्टी ग्रीन होम या संकल्पनेत अपेक्षित आहे. लक्झरी ग्रीन होम इतर घरांपेक्षा वेगळं का असतं, हे समजून घेऊ या.

नैसर्गिक जगणं
ग्रीन लक्झरी होममध्ये निसर्गच्या जवळ असणं अभिप्रेत आहे. या घराचं स्वत:चं ऑर्गेनिक गार्डन आणि पाणी पुरवठा असावा. विशेषत: शहरी भागातल्या घरांमध्ये इनडोअर गार्डनचा पर्याय असू शकतो. कारण अशा घराला बाहेर फार जागा नसते. स्वत:ला थोडंसं सदृढ ठेवायचं असेल तर तुम्ही औषधी वनस्पती आणि आरोग्यदायी प्लाण्ट लावू शकता. इनडोअर गार्डन असेल तरही लागवड करणं शक्य आहे. अर्थात हे सर्व करायला अतिरिक्त मेहनत करावी लागते पण त्यामुळे घर शांत आरामदायी बनतं हेनिश्चित.

‘चला हवा येऊ द्या’
ग्रीन होम जेवढं अधिक हवेशीर तेवढंच चांगलं. मोकळा आणि स्वच्छंदी वारावाहत असेल, तर घर अधिक आलिशान किंवा लक्झरीयस समजलं जातं. उंच छतामुळे हवा खेळती राहते. मोठ्या काचेच्या खिडक्या(फ्रेंचविंडो) असतील तर घरात भरपूर सूर्यप्रकाश येतो आणि परावर्तितही होतो. अशा प्रकारच्या खिडक्यांमधून केवळ प्रकाशच आत येत नाही तर घरातल्या खोल्याही हवेशीर राहतात.

तंत्रज्ञान स्नेही बना
ग्रीन लक्झरी होमचा आग्रह धरायचा, याचा अर्थ तंत्रज्ञान वापर टाळायचा, असं मात्र अजिबात नाही. वास्तविक पाहता नवीन तंत्रज्ञान केवळ ऊर्जेची बचत करत नाही तर ते घराला सुरक्षाही प्रदान करतं. आज वायफाय, जीपीएस, जीएएस, होम ऑटोमेशन, एफटीटीजी इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायबल क्वालिटी कम्युनिकेशन फॉर व्हाइस, डेटा आणि व्हिडिओ, व्हिडिओ डोअरबेल्स आणि अॅक्सेस कंट्रोलिंग आदींच्या माध्यमातून घर डिजिटली मॅनेज करता येतं. तंत्रज्ञान आणि निसर्गाची योग्य सांगड घातली तर माणसाचं जीवन खूप आयामदायी किंवा सोयीचं बनू शकतं. तथापि, असं घर बघा ज्यात तुम्हाला स्पीड असलेली इंटरनेट कनेक्टिविटी मिळेल आणि जी तुम्ही डिस्कनेक्ट करू शकाल. तसंच आजुबाजुला भरपूर झाडं आणि गार्डन असेल.

…तरी खरेदीदार ग्राहक मंचाकडे जाऊ शकतात
संवर्धनाचा मंत्र
तुमच्या खोलीत नैसर्गिक प्रकाश आणण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सोलर लाइटिंग पण मोठ्या हाऊसिंग टाऊनशीपमध्ये वैयक्तिक सोलर सिस्टीम लावणं शक्य नसतं. मग सार्वजनिक वापराच्या जागा आहेत, तिथे सोलर एनर्जीचा वापर करता येतो. शेवटी ती ऊर्जा निशुल्कच असते. पर्यावरण जपण्यासाठीसुद्धा सोलर एनर्जीचा वापर करून तुम्ही पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पार पाडू शकता. ऊर्जा संवर्धना आणखी एका प्रकारे हातभार लावता येऊ शकतो आणि त्यातून ऊर्जेची बचत ही करता येते. एलईडी लाइट्सचा वापर करून. या लाइट्स घरात केवळ लक्झरी वातावरण तयार करत नाहीत, तर डोळ्यांना आणि मनाला थंडावा देतात.

अफोर्डेबल हाऊसिंगचा खर्च हवा आटोक्यात
बहुतांश ग्रीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स हे स्वत:चे एसटीपी आणि वॉटर रिसायकलिंग प्लाण्ट सुरू करतात. हे प्रकल्प पर्यावरण संवर्धनात जास्तीत जास्त योगदान देतात. हायब्रीड एनर्जी सिस्टीम्स ही फार उपयुक्त आहे. त्या आर्थिक आणि पर्यावरण अशा दोन्हीबाबतीत पवन ऊर्जा, सोलर एनर्जी, जिओ थर्मल किंवा ट्राय-जनरेशन स्टॅण्ड-अलोन सिस्टीम्सच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>