Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

फॅमिली पेन्शन हे नेहमीच करपात्रपैसा झाला

$
0
0

फॅमिली पेन्शन हे नेहमीच करपात्र

पैसा झाला मोठा

सीए प्रफुल्ल छाजेड

मी एक जेष्ठ नागरिक असून मला फॅमिली पेन्शन स्कीम १९९५च्या अंतर्गत दरमहा दोन हजार रुपये मिळतात. वर्षभरात मिळून होणाऱ्या २४ हजार रुपयांच्या या उत्पन्नाचा चालू वर्षासाठी लागू असलेल्या ४० हजार रुपयांच्या वजावटीमध्ये समावेश होईल का, हे कृपया सांगावे.

एक वाचक

पेन्शन किंवा पगारासाठी प्राप्तिकर कायद्यांतर्गत चालू आर्थिक वर्षात ४० हजार रुपयांची सरसकट वजावट लागू आहे. तुम्हाला मिळणारे फॅमिली पेन्शन हे प्राप्तिकर कायद्यानुसार अन्य उत्पन्न म्हणून समजण्यात येते. त्यामुळे फॅमिली पेन्शनच्या तुमच्या उत्पन्नाला ४० हजार रुपयांची वजावट मिळू शकणार नाही.

मी एक ज्येष्ठ नागरिक असून मला २,६३,००० रुपये वार्षिक पेन्शन मिळते. याशिवाय, एका पतसंस्थेतील मुदत ठेवींवर मला २,३२,००० रुपये व एका सहकारी बँकेतील मुदत ठेवींवर १३ हजार रुपये व्याज मिळते. माझ्या नावे एक मेडिक्लेम पॉलिसी असून या पॉलिसीचा हप्ता ९ हजार रुपये आहे. करबचतीसाठी या वर्षात ८०सी कलमांतर्गत मी दीड लाख रुपये गुंतवले आहेत. याशिवाय, रोख्यांतून मला दोन हजार रुपये व्याज मिळते. ही आकडेवारी विचारात घेता चालू आर्थिक वर्षात मला प्राप्तिकर लागू होईल का व तो किती असेल, याविषयी कृपया माहिती द्यावी.

एक वाचक

या माहितीवरून तुमचे एकूण उत्पन्न ५,१०,००० रुपये असल्याचे दिसत आहे. त्यामधून पेन्शनपोटी रु. ४० हजार, बँक व्याजापोटी रु. ५० हजार, ८० सी अंतर्गत केलेली गुंतवणूक दीड लाख व मेडिक्लेमपोटी केलेली ९ हजार रुपयांची वजावट लक्षात घेता तुमचे करपात्र उत्पन्न २,६१,००० रुपये येते. हे उत्पन्न तुम्हाला लागू असलेल्या करमाफ उत्पन्नापेक्षा (तीन लाख रुपये) कमी आहे. त्यामुळे तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही.

मी पोस्टाचा अल्पबचत एजंट म्हणून ३८ वर्षांपासून कार्यरत आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात टपाल खात्याने माझ्या कमिशनमधून टीडीएस कापला व प्राप्तिकर खात्यात जमा केला. त्यानंतर पुढील सर्व वर्षांची प्राप्तिकर विवरणपत्र सीएंच्या सल्ल्याने मी दाखल केली आहेत. मात्र वर उल्लेख केलेल्या टीडीएसचा परतावा मला अद्याप मिळालेला नाही. २०१०-११ या वर्षातील सर्व आर्थिक कागदपत्रे तसेच, १६ ए अर्ज मी जपून ठेवला आहे. हा टीडीएस मला परत मिळवता येईल का, प्राप्तिकर कायद्यात त्याविषयी काही तरतुदी आहेत का, हे कृपया सांगावे.

एक वाचक

आर्थिक वर्ष २०१०-११ पासून नंतरच्या सर्व वर्षांची विवरणपत्र तुम्ही सादर केली आहेत परंतु त्यापोटी तुम्हाला देय असलेला टीडीएस परतावा मिळाला नाही असे गृहीत धरल्यास प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर (www.incometaxindiaefiling.gov.in) तुमच्या इमेल आयडीने लॉग इन करा व त्यामध्ये असलेल्या Griveance पर्यायांतर्गत तुमची तक्रार नोंदवा.

प्रश्न पाठवताना...

आपण 'पैसा झाला मोठा' सदरासाठी प्रश्न पाठवू शकता. प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर 'पैसा झाला मोठा सदरासाठी' असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, दुसरा मजला, डी. एन. रोड, मुंबई ४००००१. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>