Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

वैयक्तिक व कौटुंबिक आर्थिक सुरक्षेसाठी

$
0
0

वैयक्तिक व कौटुंबिक आर्थिक सुरक्षेसाठी आयुर्विम्याला पर्याय नसला तरी आयुर्विमा पॉलिसी विकत घेताना सावधानता बाळगावी लागते. सद्यस्थितीत भारतीय आयुर्विमा महामंडळासह अनेक खासगी विमा कंपन्या विविध प्रकारच्या पॉलिसी विकत असल्याने त्यांच्यात प्रचंड स्पर्धा आहे. यातून बरेच अपप्रकार घडत असल्याचेही वारंवार उघड झाले आहे. काही एजंट खोटेनाटे बोलून, चुकीची माहिती देऊन ग्राहकाच्या गळी पॉलिसी उतरवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आपली फसवणूक झाल्याचे अनेक ग्राहकांच्या फार उशिरा लक्षात येते. त्यामुळे त्यानंतर इर्डाकडे (इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया) तक्रार करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. आयुर्विम्याच्या बाबतीत ग्राहकांची पुढीलप्रमाणे फसवणूक होऊ शकते.

परतावा प्रत्यक्षात कमी

एखाद्या ग्राहकाने करबचतीच्या उद्देशाने पॉलिसी विकत घेण्याचे ठरवले आणि या ग्राहकास आयुर्विमा व गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांबाबत फारशी माहिती नसल्यास त्याच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. अशा ग्राहकाला एखाद्या एजंटने करबचतीसह ठरावीक वर्षांच्या अंतराने मनीबॅक, मॅच्युरिटीला मोठी रक्कम व त्यानंतरही विमाकवच ऑफर केले तर ग्राहक हुरळून जातो. या ग्राहकाचे वय ३५ मानले व २० वर्ष त्याने दरवर्षी ६५ हजार रुपयांचा हप्ता भरण्याची तयारी दाखवली तर मनीबॅकच्या माध्यमातून त्याला चार वेळा प्रत्येकी दीड लाख रुपये व मॅच्युरिटीला पाच लाख रुपये एकरकमी मिळतील. याशिवाय पावणेचार लाख रुपयांचा बोनसही त्याला मिळेल. (पॉलिसीच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १० लाख रुपये मिळतील.) मात्र या मनीबॅक योजनेचा हिशेब केला तर हा परतावा केवळ सव्वादोन टक्के असल्याचे लक्षात येईल. म्हणजे बँकेच्या बचत खात्यापेक्षा कमी!

खोटी व चुकीची माहिती

पॉलिसी विकण्यासाठी एजंटकडून ग्राहकाला खोटी व चुकीची माहिती दिली जाऊ शकते. ही पॉलिसी ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज प्लॅन) फंडाप्रमाणे आहे व यातून तुम्हाला विमाकवचही मिळेल, असे एजंटकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात ती एक युलिप योजना असते. यातून विमाकवच मिळते हे खरे आहे, मात्र त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. शिवाय, युलिप योजना ही ईएलएसएसप्रमाणे लवचिक नसते. युलिप योजनेत पाच वर्षांचा लॉक इन पीरियड असतो व त्यापूर्वी तुम्ही त्यातून बाहेर पडलात तर मोठा भुर्दंड बसतो.

बँकेचा खोटा हवाला

अमूक योजना आमच्या बँकेने सुरू केली असून ती अतिशय विश्वासार्ह व सुरक्षित असल्याचे काही एजंट सांगतात. प्रत्यक्षात ती योजना एखाद्या आयुर्विमा कंपनीचीच असते व संबंधित कंपनी व या बँकेत पॉलिसी विक्री करार झालेला असतो.

मुदत ठेवीचा मुलामा, करमुक्त परतावा व विम्याचेही प्रलोभन

ही योजना मुदत ठेवीचाच प्रकार आहे. यातून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असेल. शिवाय, या पॉलिसीत विमाकवचही आहे, असे सांगितले जाते. मात्र ही एक एण्डोव्हमेंट पॉलिसी असते व त्यातील परतावा समाधानकारक नसतो. या पॉलिसीत सलग अनेक वर्ष हप्ते भरावे लागतात व ती बंद करायची झाल्यास सरेंडर व्हॅल्यू अत्यल्प असल्याने मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

एनपीएलऐवजी ही योजना चांगली!

तुम्ही नॅशनल पेन्शन योजनेविषयी विचारणा केली तर एनपीएसच्या प्रक्रियेबाबत खोटी माहिती दिली जाते. एनपीएसची प्रक्रिया अतिशय जटिल असून त्यापेक्षा अमूक योजना घ्या, असा आग्रह धरला जातो. मात्र विमा कंपन्यांची पेन्शन योजना ही एनपीएसपेक्षा फारच खर्चिक असते. विमा कंपन्यांच्या पेन्शन प्लॅनमधून मध्येच बाहेर पडणे अवघड असते. या कंपन्या सरेंडर शुल्कही वसूल करतात.

करबचतीसाठी ईएलएसएसचा आग्रह

करबचत करायची असेल तर ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करा व बाजारातील तेजीचा लाभ घ्या, असे सांगितले जाते. मात्र ईएलएसएस फंड हे मार्केटशी संलग्न असतात व त्यात एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवणे चुकीचे ठरू शकते. ईएलएसएसचा लॉक इन पीरियड तीन वर्षांचा असल्याने तेवढा काळ थांबावे लागते. यावर उपाय म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून ईएलएसएसमध्ये एसआयपीतून गुंतवणूक करणे.

\R1. एजेंट की कही बातों पर भरोसा नहीं करें।

2. जल्दबाजी में खरीदारी नहीं करें।

3. सेकेंड ओपिनियन जरूर लें।

4. खुद पेपरवर्क भी करें।

5. फ्रीलुक पीरियड का इस्तेमाल करेंः अगर पॉलिसी के डॉक्युमेंट्स में एजेंट द्वारा बताए गए फायदों का उल्लेख नहीं है, तो 15 दिनों के फ्रीलुक पीरियड के दौरान पॉलिसी को रिटर्न कर दें।

https://navbharattimes.indiatimes.com/business/personal-finance/savings-and-investments/bank-agents-cheat-investors-by-these-methods/articleshow/66917136.cms

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>