Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

मटा गाइड

$
0
0

स्री'धन' कोणाच्या हाती?

आधुनिक स्त्रीधनामध्ये विवाहाप्रसंगी मिळणाऱ्या दागिन्यांशिवाय संबंधित महिला नोकरी किंवा उद्योगधंद्याच्या माध्यमातून कमवत असलेल्या रकमेचाही समावेश होतो. आधुनिक स्त्री कोणताही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असली तरी, वित्तीय व्यवहार आणि गुंतवणूक करताना योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत 'शेरोज'ने (Sheroes) व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर महिला गुंतवणूक करताना नेमका काय विचार करतात, कोणाचा सल्ला घेतात, एकावेळी किती गुंतवणूक करतात या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न एका सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीविषयी तुमचे मत काय आहे?

४६.४ टक्के खात्री देता येत नाही.

२१.४ टक्के धोकादायक... खात्रीशीर नाहीच.

१४.४ टक्के पती, वडील, भाऊ यांना विचारूनच.

११.२ टक्के धोकादायक, काहीही सांगता येत नाही.

०६.६ टक्के माहिती आहे... नियमित गुंतवणूक करते.

तुमच्या कुटुंबात कुणी निवृत्तीची तरतूद केली आहे का?

५३.२ टक्के होय

२३.९ टक्के नाही

१७ टक्के माहीत नाही.

५.९ टक्के गरज वाटत नाही.

गुंतवणूक कशी कराल? पारंपरिक की ऑनलाइन बँकिंगद्वारा?

१३.१ टक्के इंटरनेट बँकिंग

१३.३ टक्के मोबाइल बँकिंग

५९.५ टक्के इंटरनेट, मोबाइल बँकिंग

१४.१ टक्के परंपरागत पद्धतीने

पुरेसा वैद्यकीय विमा आहे काय?

८.९ टक्के चालू वर्षात घेण्याचा विचार आहे.

५.३ टक्के आवश्यक आहे असे वाटत नाही.

३५.४ टक्के हो

५०.४ टक्के नाही

पेमेंटसाठी कोणती पद्धत वापरता?

१४.१ टक्के इंटरनेट बँकिंग

८ टक्के मोबाइल वॉलेट

४ टक्के युनिफाइड पेमेंट इंटरफेस

४५.६ टक्के रोख

२८.३ टक्के डेबिट, क्रेडिट कार्ड

(स्रोत : शेरोज. या सर्वेक्षणात ९०० महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>