Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

पैसा झाला मोठा

$
0
0

पैसा झाला मोठा

सीए प्रफुल्ल छाजेड

मान्यताप्राप्त पीएफची रक्कम नेहमीच करमुक्त

मी एक ज्येष्ठ नागरिक असून मला वार्षिक २,९०,००० रुपये पेन्शन मिळते. चालू आर्थिक वर्षात मला ९० हजार रुपयांची थकबाकी मिळाली आहे. याशिवाय मुदत ठेवींवरील व्याजापोटीचे माझे उत्पन्न ५३ हजार आहे. तसेच, माझ्या नावे एक मेडिक्लेम पॉलिसी असून या पॉलिसीचा हप्ता १६ हजार रुपये आहे. या स्थितीत चालू आर्थिक वर्षात कर टाळण्यासाठी ८० सी कलमांतर्गत मला किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, हे कृपया सांगावे.

एक वाचक

प्रस्तुत माहितीनुसार तुमचे एकूण उत्पन्न ४,३३,००० रुपये असल्याचे दिसते. यातून पेन्शनपोटी ४०,०००, मेडिक्लेम पॉलिसीचे १६,०००, मुदत ठेवींवरील व्याजापोटी कलम ८० टीटीबी अंतर्गत ५०,००० रुपये अशा वजावटी होतील. या सर्व वजावटी गृहीत धरून तुमचे करपात्र उत्पन्न हे ३,२७,००० रुपये येईल. तुम्हाला (ज्येष्ठ नागरिक) लागू असलेली करमाफ उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये आहे. त्यामुळे उर्वरित उत्पन्नावर १,३५० रुपये प्राप्तिकर लागू होतो. परंतु तुमचे करपात्र उत्पन्न हे साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असल्याने तुम्हाला कलम ८७ अ अंतर्गत जास्तीत जास्त २,५०० रुपये किंवा देय असलेला कर यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी सवलत मिळेल. तुमच्या बाबतीत कलम ८७ अ अंतर्गत संपूर्ण प्राप्तिकर माफ होत असल्याने कलम ८० सी अंतर्गत गुंतवणूक करण्याची गरज नाही.

मी एका खासगी कंपनीतून डिसेंबर २०१५मध्ये वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झालो. मात्र निवृत्तीनंतर मी पीएफची रक्कम न काढण्याचा पर्याय स्वीकारला. ही रक्कम २५ लाख रुपये असून ती मी डिसेंबर २०१८मध्ये काढण्याचे ठरवले आहे. ही रक्कम काढल्यास मूळ पीएफ व त्यावरील व्याजावर चालू आर्थिक वर्षात प्राप्तिकर लागू होईल का यावर कृपया मार्गदर्शन करावे.

एक वाचक

तुम्ही निवृत्त झालेल्या कंपनीचा पीएफ हा मान्यताप्राप्त आहे व तुम्ही सलग पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष नोकरी केली आहे, असे गृहीत धरल्यास तुम्हाला पीएफपोटी मिळणारी सर्व रक्कम ही करमुक्त ठरेल.

माझा मुलगा ऑगस्ट २०१७मध्ये अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी गेला आहे. तिथे त्याला पूर्ण शिष्यवृत्ती असल्याने जाताना सुरुवातीच्या खर्चासाठी साधारण अडीच हजार डॉलर (काही रोख, काही कार्डद्वारे याप्रमाणे) मी त्याला दिले होते. या वर्षी तो जूनमध्ये येऊन गेला. तेव्हा त्याने एक हजार डॉलर आमच्या संयुक्त खात्यात जमा केले. तो आता एनआरओ अकाऊंटधारक झाल्याने ती रक्कम माझ्याकडे राहिली. मी दर वर्षी प्राप्तिकर विवरणपत्र या आर्थिक वर्षात हा तपशील कोणत्या रकान्यात दाखवायचा? उसने दिलेली रक्कम परत मिळाल्याचे कर वाचेल का? कृपया मार्गदर्शन करावे.

एक वाचक

उसने दिलेले पैसे अथवा कर्जाऊ रक्कम परत मिळाल्यास त्यावर प्राप्तिकर लागू होत नाही. परंतु ही रक्कम व्याजासह परत मिळाली तर ती करपात्र ठरते.

पैसा झाला मोठा' सदरासाठी प्रश्न

आपण 'पैसा झाला मोठा' सदरासाठी प्रश्न पाठवू शकता. प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा. पाकिटावर 'पैसा झाला मोठा सदरासाठी' असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, दुसरा मजला, डी. एन. रोड, मुंबई ४००००१. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>