Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

ईटी वेल्थ

$
0
0

३६ पैकी चार गुण जुळणेही पुरेसे

म्युच्युअल फंडांची नव्याने वर्गवारी करण्यात आल्याने अनेक म्युच्युअल फंड योजनांचे स्वरूप बदलले आहे. या वर्गवारीमुळे फंड हाऊसना तसेच, गुंतवणूकदारांना आपल्या फंडांत काही बदल करावे लागले आहेत. या बदलानंतर नेमकी कशात गुंतवणूक करावी असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. मात्र काही सोपे उपाय अवलंबल्यास यातून मार्ग निघू शकतो.

वर्गवारी कशासाठी?

भांडवली बाजार नियंत्रक संस्थेने (सेबी) म्युच्युअल फंडांमध्ये शिस्त आणण्यासाठी तसेच त्यांची पारदर्शक विभागणी होण्यासाठी सर्व फंडांचे पुनर्श्रेणीकरण म्हणजे वर्गवारी करण्याचा आदेश दिला होता. गुंतवणुकीचे प्रकार, जोखमीचे प्रमाण या निकषांवर ही वर्गवारी झाली. बहुतांश फंड हाऊसने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

गुंतागुंत कशामुळे?

सेबीने दिलेल्या निर्देशानंतर म्युच्युअल फंड तब्बल ३६ प्रकारांत विभागले गेले आहेत. विशेष म्हणजे, आपल्या देशात दोन हजार ४३ एवढ्या प्रचंड संख्येने म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. तसेच, यातून नऊ हजार ६८० योजनांचे पर्याय गुंतवणूकदारांसमोर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य तसेच प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. नेमकी कोणत्या फंडात गुंतवणूक करायची असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो.

सुवर्णमध्ये साधा

एवढ्या मोठ्या संख्येने म्युच्युअल फंड योजना उपलब्ध असला तरी सर्वसामान्य गुंतवणूकदाराने स्वत:च्या गरजेनुसार गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर निर्णय घेणे सुलभ होते. जोखीम घेण्याची तयारी, अपेक्षित परतावा, गुंतवणुकीचा कालावधी यावर कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची हे ठरते. ही विविध उद्दिष्टे सर्वसाधारणपणे मल्टिकॅप फॉर लाँग टर्म, अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंडस फॉर मीडियम टर्म सेव्हिंग्ज, एएलएसएस फंडस (इक्विटीसंलग्न) आणि शॉर्ट टर्म डेट फंड (बँकांतील मुदत ठेवींपेक्षा फायदेशीर प्रकार) या योजनांमधून सहज साध्य होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ३६ प्रकारांत विभागल्या गेलेल्या म्युच्युअल फंडांचा विचार करण्याची गरज नाही. आपल्या गुंतवणुकीचा प्रकार व प्राधान्य ठरवून या चार पर्यायांपैकी एकाची वा एकापेक्षा जास्त फंडांची निवड केल्यास विनासायास गुंतवणूक करता येईल. त्यामुळेच म्युच्युअल फंडांच्या बाबतीत ३६ पैकी चार गुण जुळले तरी पुरेसे असे म्हणता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>