Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

गोष्ट वास्तूतल्या वस्तूंची

$
0
0

- वैशाली जोशी, आर्किटेक्ट व डिझायनर

अनेकदा इंटिरिअरच्या कामावर पैसे खर्च करूनही घरात राहणं सहज, सोपं आणि सोयीचं वाटत नाही. घरात केलेल्या फर्निचरनुसार त्यातली माणसं राहत असतात. म्हणजे माणसांसाठी घर की फर्निचरसाठी घर, असा प्रश्न पडावा इतकं हे फर्निचर माणसांना हाताळत असतं. केलेलं फर्निचर गैरसोयीचे आहे, हे एव्हाना कळलेलं असतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मग आहे त्यातच 'अ‍ॅडजस्ट' केलं जातं.

बरेचदा लोकांना आपल्याला नक्की काय हवं आहे याचाच अंदाज नसतो. अशा वेळी कशाप्रकारचं फर्निचर हवं आहे, यापेक्षा तुमचं राहणीमान कसं आहे, याचा विचार करावा. आपल्या सोयीसाठी आपण घर बनवणार असतो. पण, आपली सोय नक्की कशात आहे याचा आधी शोध घ्यायला हवा. याला ढोबळमानाने 'डिझाइन ब्रीफ' असं म्हणता येईल. या ब्रीफच्या आधारे तुमच्या गरजा ठरू शकतात. आम्हाला अनेकदा क्लायंटची लाइफस्टाइल समजून घेऊन त्यांना ब्रीफसाठीही मदत करावी लागते.

माणसं आणि त्यांना लागणाऱ्या निर्जीव वस्तू या दोघांमुळेही घराला घरपण असतं असं मला वाटतं. या लेखात आपण घरात राहणाऱ्या व्यक्तींबद्दल विचार करू. म्हणजे त्यांची रंग, पोत, स्टाइल याबाबतची आवड नाही हं! इंटिरिअर डिझाइनला तेवढ्यातच अडकवून ठेवण्याला इंटिरिअर डिझायनर्सच कारणीभूत आहेत. आज आपण त्यापेक्षा जरा खोलवर जाऊन विचार करू.

माणसांच्या मोजमापांनुसार (मानवमिती - अँथ्रोपोमेट्री) अगदी एक-दोन इंचांनीही 'सोय' की 'गैरसोय' हे ठरू शकतं.

घरात कोणकोण राहणार आहेत, याबरोबरच त्यांचे व्यवसाय, वय यानुसार घरातल्या बैठक व्यवस्थेपासून टॉयलेट कसं असावं इथपर्यंत गोष्टी बदलू शकतात. त्यांची उंची आणि जाडी याही कुठल्याही सीटिंगची उंची आणि रूंदी ठरवतात. कधीकधी संपूर्ण कुटुंब स्टॅण्डर्ड डेटापेक्षा उंच किंवा बुटकं असतं. घरातल्या स्वयंपाकाच्या ओट्याची उंची, ओव्हरहेड कपाटांची उंची, आतल्या कप्प्यांची रचना अशा बऱ्याच गोष्टी सोयीनुसार करता येतात. अनेक ठिकाणी उंच किंवा कमी उंचीच्या ओट्यामुळे गृहिणी बेजार झालेल्या दिसतात. सोयीची उंची करायला वेगळे पैसे पडत नसतात, पण बनवताना अशा गोष्टींचे महत्त्व कळायला हवं. एकदा हे चुकलं, की गैरसोय सहन करत बसावी लागते. ही कामं वारंवार करणं शक्य नसतं.

मध्यंतरी भारतीय बैठकीची खूप स्टाइल होती. खरंतर ती खूप छान दिसते. पण घरातल्या वृद्धांचा आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचा विचार करून दुसरी उठा-बसायाला सोयीची बैठक व्यवस्थाही असावी.

फॉल्स सीलिंग करताना घरातल्या उंच माणसाचा हात पंख्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

दारांच्या कड्या किंवा लॉकिंग सिस्टिम बसवताना कोणाचे हात पोहोचले पाहिजेत आणि कोणाचे नाहीत हे बघावं. अनेकदा मुलांनी नको ती कडी लावल्याने गोंधळ होतात किंवा वरची कडी (टॉवर बोल्ट) इतका वर असतो, की घरातल्या फक्त एखाद्याच उंच माणसावर त्याची कायमची जबाबदारी येते.

अगदी टॉयलेटमधल्या कमोडची उंचीही व्यक्तीनुसार वेगळीच आणि सोयीची असावी.

प्रत्येक माणसाशी निगडित स्पेस त्याच्या गरजेनुसार असावी. ढोबळमानाने मुलं आणि मोठे असं वर्गीकरण सर्वत्र दिसतेच. पण प्रत्येक मोठ्याची गरजही वेगवेगळी असू शकते, नव्हे असतेच! अगदी जास्त कपडे हँगरला ठेवणार की घडी घालून ठेवणार इथपासून, लॅपटॉप की डेस्कटॉप, झोपताना वाचन

करता की नाही, टी.व्ही. किती महत्त्वाचा आहे, कॉस्मेटिक्स किती आणि कशी वापरता, इथपर्यंत अनेक वैयक्तिक सवयी या वेगवेगळ्याच असणार. मग सगळ्यांसाठी इंटिरिअरचा एकच फॉर्म्युला कसा सोयीचा असेल?

प्रत्येक खोलीतल्या बारीकसारीक गरजांनुसार कसं डिटेलिंग करता येईल, ते आपण स्वतंत्रपणे पुढे बघूच; पण वर चर्चिलेल्या गोष्टींव्यतिरिक्तही स्वतःबद्दलच्या अनेक गोष्टी, डिझाइनचं प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या आधी स्पष्ट असाव्यात हा आजच्या लेखाचा उद्देश.

सहसा अशा बाबींकडे दुर्लक्षच केलं जातं. पण राहायला लागल्यावर त्याचे दूरगामी गैरसोयीत रूपांतर होतं आणि फक्त तेवढ्यासाठी घरात पुन्हा काम काढायचा उत्साह संपलेला असतो. घरातल्या माणसांबरोबरच, माणसांच्या वापरातल्या वस्तूंची मापंही तितकीच महत्त्वाची!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>