Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

जमिनीच्या मालकीची खातरजमा करा

$
0
0

प्रश्न

भांडूप पश्चिम येथील मौजे कांजूर, तालुका कुर्ला येथील भूखंडाचे क्षेत्रफळ १०८४ चौरस मीटर इतके असून त्यापैकी ५२४.४ चौरस मीटर जागेवरील ५० वर्षांच्या जुन्या चाळीत आम्ही ११ सभासद सेल्फ कंटेट्ड गाळ्यांत राहतो आहोत. आठ गाळे सुमारे ४५० तर तीन गाळे २०० चौरस फूटांचे आहेत. सोसायटी नोंदणीकृत नाही. जागामालकाने सन १९८८मध्ये तत्कालीन ११ कब्जेदारांना चाळीतील गाळे व त्याखालील जागा मालकीहक्काने दिली असून मालमत्ता पत्रांवरही त्यांची नावे आहेत. या ११पैकी ५ गाळेधारक मूळ कब्जेदार असून उर्वरित सहाजणांनी मूळ कब्जेदारांकडून गाळे विकत घेतलेले आहेत. भूखंडावरील अर्ध्या भागात दुसरी सोसायटी (नियोजित) असून त्यात २१ रहिवासी आहेत. या गाळ्यांचे क्षेत्रफळ प्रत्येकी सुमारे २०० चौरस फूटांचे आहे. संपूर्ण भूखंडाच्या मालमत्ता पत्रावर आमच्या सोसायटीमधील तत्कालीन ११ सभासदांची नावे आहेत. सोसायटीच्या एका बाजूला सुमारे १० फूट सर्व्हिस रोड असून दुसऱ्या बाजूला नियोजित ९० फूट रस्ता आहे. नमूद परिसर/भूखंड एसआरएने झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित केला असल्याचे आम्हाला अलीकडेच समजले आहे. भूखंडाच्या अर्ध्या भागावरील सोसायटीने त्यांच्या सभासदांची संमती घेऊन एका विकासकामार्फत अर्ध्या जागेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामध्ये आमच्या रहिवाशांची नावे असलेले मालमत्ता पत्र जोडलेले आहे. प्रश्न असे, कीः १)आम्हा ११ रहिवाशांना पुनर्विकास करायचा असून एसआरएअंतर्गत नको आहे. खासगी पुनर्विकास करता येणे शक्य आहे का? त्यासाठी काय करावे? २) आम्ही राहत असलेली जागा गलिच्छ वस्ती नाही, आम्ही घुसखोर नाही, जागा विकत घेतलेली आहे. एसआरए प्रकल्पामध्ये आमचे नुकसान होणार. कमी जागा मिळेल. आम्हाला एसआरएने झोपडपट्टी क्षेत्र म्हणून केलेले आरक्षण रद्द करता येईल का? ३) अर्ध्या जागेमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यांचे प्रपत्र-२ तयार झालेले आहे. भूखंडाची हिस्साफोड (सब डिव्हिजन) न करता एसआरए प्रस्तावाला मान्यता देईल का? दोन्ही सोसायट्यांचा सव्र्हे नंबर एकच असल्याने भविष्यात आमची जागा काबीज केली जाण्याची भीती वाटते, त्यासाठी काय करावे?
-वि. ल. आर्डेकर, भांडूप

उत्तर

आपण आपल्या निवेदनात अनेक खुलासे केले, पण या सदनिका अधिकृत आहेत की नाहीत याचा काही खुलासा नाही. जर राहत असलेली घरे अधिकृत असतील, आणि महागरपालिकेची आयओडी मिळाली असेल, तर त्या सदनिका ज्या जमिनीवर उभ्या आहेत, ती झोपडपट्टी या वर्गवारीत येत नाही. जरी सदनिका मूळ मालकाकडून विकत घेतल्या असतील, तरी त्या जर अनधिकृत असतील, तर त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन कायदा लागू शकेल किंवा कसे हा प्रश्न आहे. आपण पूर्ण जमिनीवर ११ सभासदांची मालकी आहे असे म्हणता, मग दुसऱ्या सोसायटीने एसआरए राबवायचा प्रयत्न केला, तेव्हा आपण मंडळींनी त्यांच्याशी संवाद केला का? जर आपण मालक असाल, तर अर्ध्या भागात एसआरए राबवण्याकरता आपला अधिकार प्राधान्याने आहे. त्यांच्या योजनेकरताही तुमची संमती हवी. ती तुम्ही दिली आहे का? याबाबत तुम्ही काही उल्लेख केलेला नाही. तसेच प्रस्तावित गृहनिर्माण संस्था आणि आपल्यात जमीनवाटपासंबंधात कोणतेही लिखित/अलिखित करार झालेले आहेत का? तुमच्यासमोर पर्याय असे आहेतः‍ १) झोपडपट्टी पुनर्वसन योजना आपल्या अर्ध्या भागात केली जाणार असेल, तर त्याच धर्तीवर आपण त्यांना एक योजना द्यावी, जेणेकरून त्यांना योजनेत मिळणार, तितकीच घरे मिळतील. एकदा त्यांचा प्रश्न सुटला, की उर्वरित भागामध्ये २.७ इतका एफएसआय मिळेल व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत न जाता आपण मालक म्हणून जमिनीचा विकास करू शकाल. ही सर्व माहिती आपण दिलेल्या तपशीलाच्या आधारे देत आहोत. २)जमिनीची मालकी मूळ मालक ही ११ जणांच्या नावावर कशी करेल असा प्रश्न मनात येतो. आपण ज्यांच्याकडून ही जमीन घेतली, ते या जमिनीचे खरेच मूळ मालक आहेत का, की तेही कब्जेदारच आहेत याविषयीही आपल्या निवेदनात खुलासा नाही. मालक जर कब्जेदार असेल, तर आपले अधिकार काय असतील याविषयी कायदेशीर सल्ला घेणे आले. मात्र तो जर जमिनीचा मालक असेल व सातबारावर नोंद मूळ मालक अशी असेल, तर त्याच्याकडून घेतलेली जमीन आपल्याला झोपडपट्टी योजना जाहीर न करता इतर सोसायट्यांना लागू होणाऱ्या नियमांचा विकासकामासाठी उपयोग करता येईल. ३) दोन्ही सोसायट्यांचा सर्व्हे नंबर एकच असल्याने आपण ११जण मालक असल्याने इतर कुणी कब्जा करू शकणार नाही. पण आपल्याला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत टाकले गेले, तर मात्र जे मिळेल, ते घ्यावे लागेल. सबब योग्य तो कायदेशीर सल्ला घ्यावा व मगच पुढील वाटचाल करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>