Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

विमुद्रीकरणाचा घरांच्या विक्रिवर परिणाम

$
0
0

- टीम टाइम्स प्रॉपर्टी

केंद्र सरकारच्या, ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा मोठा परिणाम बांधकाम व गृहनिर्माण क्षेत्रावर झाला आहे. परिणामी, गुंतवणूकदार आणि बिल्डरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. निश्चलनीकरणामुळे जमिनी आणि घरांच्या किमती कमी होतील असा विश्वास व्यक्त होत असताना विकासकांनी मात्र, अशा प्रकारच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. विमुद्रीकरणामुळे गृहकर्जावरील व्याजदर कमी होण्यास मदत होणार आहे आणि याचा ग्राहकांना नक्कीच फायदा होईल असं रिअल्टी क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे.

मात्र, लक्झरीअस प्रकल्पांच्या किमती निश्चलनीकरणामुळे कमी होऊ शकतात असा प्रॉप्रटी सेक्टरमधील तज्ञांचा अदाज आहे. आताच्या घडीला साधारणपणे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (एमएमआर) दोन लाखांपेक्षा अधिक घरं (यूनिट्स) पडून असून यापैकी नव्वद हजाराच्याजवळपास ही एकट्या मुंबईत आहेत. तेव्हा आपल्या प्रकल्पातील जास्तीत जास्त घरं (यूनिट्स) विकली जावीत यासाठी विविध लक्षवेधक सवलती ग्राहकांना देऊन स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न येत्या काळात विकासक आणि बिल्डर करतील असं देखील जाणकार सांगत आहेत.

साधारणत: गेल्या ५ वर्षांपासून प्रॉप्रटी सेक्टरला मिळणारा प्रतिसाद हा फारसा काही सकारात्मक नाही. विकासकांनी आणि बिल्डरांनी घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्याने प्रॉपर्टी मार्केट मागील तीन वर्षापासून मंदीचा सामना करते आहे. घरं बांधून तयार आहेत परंतु त्या घरांना आवश्याक प्रमाणात ग्राहकांकडून किंवा गुंतवणूकदारांकडून उचल नसल्याच चित्र प्रॉपर्टी सेक्टरमध्ये पहायला मिळतय. यातच मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा घरांच्या उभारणीवर तसेच खरेदी विक्रिवर मोठा परिणाम होत असल्याचं दिसत असून घरविक्रित झालेली घट विकासक आणि बिल्डरांना विचार करायला लावणारी आहे.

परिणाम तात्पुरता…

गेल्या महिन्याभरात घरनोंदणी आणि घरांच्या विक्रीत कमलीची घट झालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे आधीच मंदीच्या गर्तेत लोटलेल्या गृहनिर्माण क्षेत्रावर पाचशे आणि हजार रुयांच्या मोठ्या चलनी नोटा चलनातून बाद केल्याचा परिणाम झाल्याचे मान्य

करताना ही घट तात्पुरती असून एक दोन महिन्यांत परिस्थीती पुन्हा बदलेल असा आशावाद प्रॉप्रटी क्षेत्रांतील जाणकार व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>