Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

परिस्थितीनुसार दुरुस्ती खर्च वाटा

$
0
0

प्रश्नः मुंबईच्या पूर्व उपनगरातील आमची ‘म्हाडा’ची, १९८०मध्ये बांधलेली, तळमजला व चार मजले अशी २० सदस्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. आमची सोसायटी नोंदणीकृत असली, तरी मालमत्तेचे अभिहस्तांतर झालेले नाही. अलीकडेच सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन तृतीयांश बहुमताने सदस्यांनी असा ठराव संमत केला, की इमारतीच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’च्या अहवालानुसार व शिफारशींप्रमाणे इमारतीच्या बाहेरील दुरुस्ती सभासदांकडून वर्गणी जमा करून करण्यात येईल. प्रत्येक सदनिकेच्या आतील दुरुस्ती मात्र त्यात्या सदनिकामालकाने स्वखर्चाने करून घ्यावी. त्याप्रमाणे १९ सभासदांनी सदनिकांतर्गत दुरुस्तीचे काम स्वखर्चाने करवून घेतले. तळमजल्यावर राहणाऱ्या एका सदस्याच्या सदनिकेच्या छताचे प्लास्टर निघाला असून लोखंडी सळया दिसत आहेत. त्याचे म्हणणे मात्र असे, की हे दुरुस्तीचे काम सोसायटीनेच केले पाहिजे. तो बाहेरील दुरुस्तीच्या कामाची वर्गणी देण्यास नकार देत आहे. सदर बाब आम्ही ‘म्हाडा’च्या दुय्यम उपनिबंधकांच्या (सब रजिस्ट्रार) निदर्शनास आणली असता त्यांनी सहकार न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. या पेचातून आम्ही कसा मार्ग काढावा आणि कायदा काय म्हणतो?

- व्ही. जी. पी., मुंबई.

उत्तरः याबाबतची योग्य कायदेशीर बाजू अशी आहे, की इमारतीच्या सर्व सामायिक भागांच्या दुरुस्तीची जबाबदारी ही ‘सोसायटी’ची असते. त्याचप्रमाणे, सदनिकांच्या आतील भागांची दुरुस्ती ही त्या सदस्यांची जबाबदारी असते. परंतु, काही प्रकरणांत, जेथे सदनिकांच्या आतील भागात नुकसान झालेले असेल तर आणि त्याला सदनिकेत राहणारा सदस्य जबाबदार नसेल. उदाहरणार्थ, वरील बाजूच्या सदनिकेतून होणारी गळती किंवा दुरुस्तीच्या कामामुळे नुकसान झाले असेल तर तेथील परिस्थिती वेगळी असते. अशा परिस्थितीत ‘सोसायटी’ असा निर्णय घेऊ शकते की ज्या सदस्याच्या सदनिकेतून समस्या उद्भवली असेल आणि तीमुळे ज्या सदस्याच्या सदनिकेचे नुकसान झाले असेल त्या दोघांनी मिळून दुरुस्तीचा खर्च करावा. काही सोसायट्यांनी असाही निर्णय घेतला आहे की पूर्ण खर्चामधील काही हिस्सा ‘सोसायटी’ स्वतः देईल. परंतु, तळमजल्यावरील सदस्याने घेतलेली भूमिका ही योग्य नाही. त्याच्या सदनिकेचे आतील छत दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या खर्चातील वाटा त्याने उचलला पाहिजे आणि सर्व खर्च ‘सोसायटी’नेच करावा अशी मागणी तो करू शकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>