Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

फर्स्ट होमसाठी नेरळचा पर्याय उत्तम

$
0
0

- टीम टाइम्स प्रॉपर्टी

माथेरानला जायचं असेल तर नेरळवरून जावं लागतं एवढीच काय ती नेरळची ओळख. परंतु, आता हे चित्र बदलत असून घर गुंतवणुकीसाठीचा लोकप्रिय पर्याय म्हणून नेरळ नावारूपास येत आहे. चांगली कनेक्टिव्हिटी, घरांच्या परवडणाऱ्या किमती आणि सभोवतालच्या परिसराचा वेगाने होत असलेला विकास यामुळे फर्स्ट होमसाठी ग्राहकांकडून नेरळला पसंती मिळत आहे.

नेरळ तसं सेकंड होम किंवा वीकएण्ड गेटवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. परंतु, आता नेरळची ही ओळख हळूहळू पुसली जात असून घर गुंतवणुकीसाठीचा लोकप्रिय पर्याय म्हणून नेरळ नावारूपास येत आहे. गेल्या काही वर्षांत नेरळचा विकास झपाट्याने झालेला पाहायला मिळतो. एकेकाळी पायाभूत सुविधा, चांगली कनेक्टिव्हिटी आणि विकास अशा सर्वच पातळीवर मागे पडलेलं नेरळ आता मात्र मोठमोठाले प्रकल्प, चांगल्या शाळा, हॉस्पिटल्स आणि चांगल्या पायाभूत सुविधांनी बहरलं आहे. नेरळ हे गुंतवणुकीसाठी ग्राहकांचं आवडतं ठिकाण बनलं आहे.

नेरळला गुंतवणुकीसाठी प्राधान्य मिळण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सुधारलेली कनेक्टिव्हिटी. नेरळ हे मुंबईपासून तासभराच्या अंतरावर आहे. तर नेरळची नवी मुंबईशी असलेली कनेक्टिव्हिटी पाहून अनेकांनी इथे घरं घेतली आहेत. नवी मुंबईतली खारघर, बेलापूर आणि वाशी ही ठिकाणं 'कमर्शियल हब' म्हणून ओळखली जातात. याठिकाणी अनेक कंपन्यांची कार्यालयं आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी दररोज प्रवास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी चांगली असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळे नोकरदार वर्गाला ऑफिसला जा-ये करणं अधिक सोयीचं पडतं. नेरळ नोकरदार वर्गाची ही गरज पूर्ण करत असल्याने ग्राहक घर विकत घेताना नेरळची निवड करतात.

कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरनंतर घरांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नेरळ हे सर्वात पसंतीचं ठिकाण बनलं आहे. याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे घरांचे दर. नेरळमध्ये घरांचे दर हे लोकांना परवडणारे आहेत. मुंबई आणि नवी मुंबईच्या तुलनेत नेरळमधल्या घरांचे दर खूपच कमी आहेत. नवी मुंबईतल्या बेलापूर किंवा वाशीमधल्या वनबीएचके घराच्या किमतीत नेरळमध्ये टूबीएचकेचं घर येऊ शकतं. तसंच नेरळमधले विकासक आपल्या प्रकल्पांमध्ये चांगल्या सोयीसुविधा ग्राहकांना पुरवत आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागातल्या प्रकल्पांमध्ये असलेल्या सुविधांच्या तोडीस तोड सोयी नेरळमध्ये ग्राहकांना विकासक देत आहेत. क्लब हाऊस, जिम, स्वीमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक अशा सुविधा प्रकल्पांमध्ये आघाडीवर आहेत. परवडणाऱ्या दरांत आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशी घरं ग्राहकांना मिळत असतील तर साहजिकच, नेरळसारखी ठिकाणं जी मु्ख्य शहरांपासून काही अंतरावर आहेत अशांनाच गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होईल. नेरळमध्ये मुंबई-ठाण्याच्या तुलनेत मोकळ्या जागेचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विकासकांना मोठे आणि परवडणारे प्रकल्प तयार करण्यास वाव आहे. त्यामुळे प्रकल्पातल्या सोयी-सुविधांबरोबरच नेरळमध्ये वाचनालयं, मोठ्या बागा, मैदानं तसंच फूड जॉइंट्सदेखील तयार होत आहेत.

नेरळला निसर्गाचं उत्तम सान्निध्य लाभलं आहे. त्यामुळे चांगल्या हवेत जास्तीतजास्त राहता यावं या उद्देशानेदेखील अनेकांनी नेरळमध्ये घरं घेतली आहेत.

चालू विकासाबरोबरच भविष्यात येऊ घातलेल्या विकासकामांमुळेसुद्धा नेरळ गुंतवणुकीसाठी 'हॉट डेस्टिनेशन' बनलं आहे. राज्य सरकारने नेरळ परिसरात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विविध प्रकल्पांच्या घोषणादेखील केल्या आहे. अलिबाग-विरार मार्गाचा भाग असललेल्या कर्जत-बदलापूर रस्त्याचं रूंदीकरण प्रस्तावित आहे. या रस्त्याचं चौपदरीकरण केलं जाणार आहे. त्याबरोबरच कर्जत-मुरबाड रस्त्याचंदेखील चौपदरीकरण केलं जाणार आहे. माथेरान आणि भीमाशंकरमार्गे पनवेल-चाकण महामार्गाचा विकासदेखील प्रस्तावित आहे. अशा प्रकल्पांमुळे घर गुंतवणुकीत नेरळला भविष्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार यात शंकाच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>