घरात कोणत्या बाजूला सूर्यप्रकाश येतो आणि उन्हाची थेट किरणं कोणत्या भिंतीवर पडतात हे पाहा. जिथून उष्णता जास्त येते त्या भिंतीवर लक्ष केंद्रित करून त्या बाजूला सौर पॅनल किंवा उष्णतेवर चालणाऱ्या उपकरणांच्या सौर पट्ट्या ठेवा. याने उन्हाचा वार कमी होऊन वापर जास्त होतो आणि आडोसा मिळाल्याने थेट उष्णतेपासून बचावही होतो.
घराच्या खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून घरात हवा खेळती राहिल. यामुळे प्रदूषण पसरवणारे वायू जलद गतीने बाहेर जातात.
घरातल्या जमिनीवर किंवा फरशीवर उष्णतेला प्रतिबंध करणारं जाजम किंवा गालिचा असेल तर उन्हामुळे येणारी उष्णता आणि त्यामुळे होणारी भगभग रोखता येते.
वाळ्याचे किंवा कापडी पडदे लावून त्यावर पाणी मारणं, एसी-पंख्यांचा वापर आपण घर थंड करण्यासाठी करतोच. पण त्याखेरीज घराला थंडावा देणारे वड-कडुनिंबाचे बोन्साय वृक्ष किंवा आलं, तुळस, गवती चहाच्या कुंड्याही थंडावा देतात.
छतामध्ये ज्यूटचं डिझाइन केलं असेल किंवा सुतळीच्या पोत्यांचं नक्षीकाम असेल तर गरम झळा त्यात शोषल्या जातात. ज्याप्रमाणे आपण घरात फॉल्स सीलिंग करतो तसं पण अधांतरी नक्षीकाम केल्यास छताकडे जाणाऱ्या गरम झळा खालच्या भागामध्ये उष्णता पुन्हा फेकत नाहीत. या जाळीवर थोडंथोडं पाणी उडवल्याने कमी खर्चात घरात थंडावा राखता येतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट