Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

वारसा ब्रिटिशकालीन बांधकामाचा

$
0
0

- गणेश आचवल

मीराकृपा इमारतीत शिरल्या-शिरल्या एक मोट्ठी लॉबी दिसते. तिथे आता दवाखाना आहे. इथे 'आनंदाश्रम' नावाचा लॉजसुद्धा आहे. इमारतीच्या जिन्याच्या पायऱ्यांसाठी सागवानी लाकूड वापरलं आहे. या पायऱ्यांची रचना 'पियानो नोबिली' या पद्धतीत मोडते. ही इमारत मॅन्शन स्टाइल पद्धतीत आहे.

गिरगावातल्या १०० गाठलेल्या इमारतींपैकी एक म्हणजे मीराकृपा बिल्डिंग. ही इमारत साधारणपणे १९०७ च्या सुमारास बांधण्यात आली असं सांगितलं जातं. गिरगाव रोडवर ही इमारत असून खोताच्या वाडीच्या आणि निकद्वारी लेनच्या बाजूलाच मुख्य रस्त्यावर ती दृष्टीस पडते. या इमारतीचा अगदी पूर्ण पत्ता सांगायचा झाला तर १६३, जे.एस.एस. रोड असा सांगता येईल.

ब्रिटिशांच्या काळात ज्या इमारती बांधल्या गेल्या, त्यांच्या बांधणीची पद्धत खूप आकर्षक आहे. ही इमारत त्यापैकीच एक. हे बांधकाम कलोनिअल पद्धतीचं आहे. तळमजला आणि वर चार मजले अशी या पद्धतीची रचना आहे.

मीराकृपा इमारतीत शिरल्या-शिरल्या एक मोट्ठी लॉबी दिसते. तिथे आता दवाखाना आहे. इथे 'आनंदाश्रम' नावाचा लॉजसुद्धा आहे. इमारतीच्या जिन्याच्या पायऱ्यांसाठी सागवानी लाकूड वापरलं आहे. या पायऱ्यांची रचना 'पियानो नोबिली' या पद्धतीत मोडते. ही इमारत मॅन्शन स्टाइल पद्धतीत आहे. प्रत्येक मजल्यावर ८०० चौरस फुटाचा हॉल आणि २४० चौरस फूट आकाराच्या तीन खोल्या आहेत. हीच रचना सर्व मजल्यांना आहे. फ्लोअरिंग आणि सीलिंग यातलं अंतर खूप असल्याने काही घरांमध्ये पोटमाळेसुद्धा बांधण्यात आले आहेत. पूर्वी इथे सार्वजनिक स्वच्छतागृहं होती. मात्र काळानुरूप सर्वांनी आपापल्या घरात स्वच्छतागृह बांधलं आहे. या इमारतीत एक टेरेस फ्लॅटसुद्धा असून तिथे एक कुटुंब राहतं.

'मीराकृपा' इमारतीत राहणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींबाबत सांगायचं झालं तर सुप्रसिद्ध छायाचित्रकार आर व्ही उर्सेकर हे इथले रहिवासी. पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू ,नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल यांची छायाचित्रं काढण्याचं भाग्य उर्सेकरांना लाभलं. उर्सेकर हे कलाप्रेमी व्यक्तिमत्व . सुप्रसिद्ध गायक ,अभिनेते बालगंधर्व सुद्धा कधीकधी उर्सेकरांकडे मुक्कामाला यायचे आणि बालगंधर्व यांनी रियाजाला सुरुवात केली की गिरगावच्या रस्त्यावर अनेक जण गोळा व्हायचे, अशी आठवण इथले रहिवासी सांगतात. पूर्वी म्हणे 'मीराकृपा'मध्ये उभं राहिलं की समोरची चौपाटी आणि समुद्र दिसत होता. आता मात्र या इमारतीतून समुद्र दिसत नाही. कारण या इमारतीसमोर अनेक इमारती आल्या आहेत. या इमारतीत आता मराठी आणि गुजराती भाषिक ८-१० कुटुंबंच राहतात. शंभरी ओलांडली तरी बांधकाम मजबूत असणं हे या इमारतीचं वैशिष्ट्य लक्षात राहतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>