Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

आकर्षक देवघरं

$
0
0

बऱ्याच घरांमध्ये देवांसाठी वेगळी खोली जरी नसली तरी आकर्षक देवघरं लावली जातात. संगमरवर, लाकडी, पत्रा, फायबर किंवा प्लास्टिक अशा विविध मटेरियलमध्ये मिळणारी ही देवघरं खूपच सुबक आणि शोभिवंत असतात.

'देव देव्हाऱ्यात नाही' हे खरं असलं तरी आजकाल देवांसाठी मात्र वेगळी रूम किंवा देवघर करण्याचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांपासून वाढत चालला आहे. पूर्वी घरात एका छोट्याशा कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरात देवघर असायचं. परंतु आता घराचं काम करतानाच अनेक जण आवर्जून देवांसाठी वेगळी रूम बनवून घेण्याला प्राधान्य देतात.

देवासाठी स्वतंत्र रूम करण्याची प्रत्येकाची कारणं निरनिराळी असू शकतात. काहींच्या मते, लाइफस्टाइल बदलल्यामुळे घरं प्रशस्त बनली आहेत. पण ज्या देवाच्या आशीर्वादामुळे घर झाले, त्यांनाही प्रशस्त जागा हवीच ना. तर काहींच्या मते वेगळा देव्हारा असेल किंवा रूम असेल तर घरातल्या देवघराचं पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.

बऱ्याच घरांमध्ये देवांसाठी वेगळी खोली जरी नसली तरी आकर्षक देवघरं लावली जातात. संगमरवर, लाकडी, पत्रा, फायबर किंवा प्लास्टिक अशा विविध मटेरियलमध्ये मिळणारी ही देवघरं खूपच सुबक आणि शोभिवंत असतात. ती जमिनीवर ठेवता येतात किंवा भिंतीवरही लावता येतात. साधारणपणे दीड फुटापासून ते ४ फूट उंचीची असणाऱ्या या मंदिरांची किंमत १००० रुपयापासून २५००० रुपयांपर्यंत आहे. या देवघरांमध्ये ओपन आणि दरवाजा असलेले असे दोन प्रकार पाहायला मिळतात. काही देवघरांमध्ये खालच्या बाजूला नैवेद्य ठेवण्यासाठी जागा असते व पूजा साहित्य ठेवण्यासाठी ड्रॉवर तर काही ठिकाणी नुसता कप्पा असतो.

संगमरवरी मंदिरामध्ये कुंदन वर्क, मीनाकारी, जाळी वर्क, इटालियन, कार्व्हिंग असे प्रकार पाहायला मिळतात. तपकिरी, ऑफ व्हाइट, पांढऱ्या रंगामध्ये मिळणाऱ्या लाकडी किंवा पत्र्याच्या मंदिरावर सुंदर नक्षीकाम, मीनाकाम केलेलं पाहायला मिळतं. लाकडी मंदिरं ही सागवान, शिसम, श्रीपर्णी अशा वृक्षाच्या लाकडापासून बनवलेली असतात तर पत्र्याची मंदिरं ही व्हाइट मेटल किंवा पंचधातूची असतात. त्यातही मीनाकाम केलेलं, ऑक्साइड, मॅट फिनिशिंग, कॉपर इत्यादी प्रकार पाहायला मिळतात.

या मंदिरांमध्ये आतल्या बाजूला ३ किंवा ४ पायऱ्या असतात तर काहींमध्ये एकच पायरी असते.

या देवघरांमध्ये विजेचा दिला लावण्यासाठीही जागा असते. साधारणपणे देवघरासाठी वेगळी रूम असेल तर तिथे संगमरवरी मंदिरं वापरण्यात येतात. कारण ही मंदिरं जड आणि आकारानेही मोठी असतात. वेगळ्या रूममध्येही प्रशस्त मंदिरं उठून दिसतात. याउलट पत्र्याची किंवा लाकडाची मंदिरं ही वजनाने हलकी असल्याने सहजपणे भिंतीवर लावता येतात. त्यामुळे स्वतंत्र देवघर पण दिसतं अन जागाही कमी लागते.

- टीम टाइम्स प्रॉपर्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>