पेपर रोल आणि टिश्यू रोलचं मखर
या पर्यावरणस्नेही मखरामुळे गणपतीसाठी केलेली सजावट आणखी सुंदर बनवेल शिवाय त्यामुळे घराच्या उत्सवी वातावरणातही भर घालेल.
साहित्य: कलर पॅलेट, पाण्याचं भांडं, बार्बेक्यू स्टिक्स, रिसायकल वर्तमानपत्रं, मासिकं, पेपर, टिश्यू पेपर रोल्स, फॉइल मिरर्स, दोरे
कृती: रिसायकल केलेली वर्तमानपत्रं घ्या. कागद अर्ध्या आकारात कापून घ्या. अर्धा कागद घेऊन त्यांच्या बारीक आकाराच्या आणि एक इंची रूंदीच्या पट्ट्या बनवा. त्यांची टोकं फेव्हिकॉलने चिकटवा. अशा प्रकारच्या ११० पट्ट्या बनवा.
१) वर्तमानपत्राची प्रत्येक पट्टी घ्या आणि एका आड एक पद्धतीने विणा. साधारणतः १०'x१०' आकाराची चौकोनी मॅट तयार होईल अशा प्रकारे विणा.
२) मासिकाची पानं घ्या. बार्बेक्यू स्टिकच्या मदतीने कागद रोल करून कडा फेव्हिकॉलच्या सहाय्याने चिकटवा.
३) १६० पेपर स्टिक्स बनवा
४) टिश्यू पेपर घ्या. पेपर कटरच्या सहाय्याने रोल अर्ध्यातून कापून घ्या. अशा प्रकारचे आठ रोल तयार करा.
५) आधी बनवलेल्या मासिकाच्या स्टिक्स घ्या. स्टिक्सच्या दोन्ही बाजूंनी कापलेले टिश्यू रोल घट्ट लावून घ्या जेणेकरून स्टिक्सला आधार मिळेल. फेव्हिकॉलच्या सहाय्याने टिश्यू रोल्स घट बसवून घ्या आणि ते सुकण्यासाठी ठेवा.
६) बारीक पट्ट्या घ्या आणि त्या आणखी गुंडाळून गोलाकार बनवा. फेव्हिकॉल वापरून सर्व रिंग्ज चिकटवून मॅट बनवा. मॅट बनवण्यासाठी अशा प्रकारच्या ४५ रिंग्ज लागतील. फेव्हिकॉलने रिंग मॅटच्या कडांवर कागदी पट्ट्या लावून घ्या. (मुख्य चित्र बघा)
७) बारीक, चपट्या पट्ट्या आणखी गुंडाळून त्याच्या रिंग्ज बनवा. रिंग्जच्या कडा फेव्हिकॉलने चिकटवून घ्या. आतल्या बाजुने पोकळ असणाऱ्या अशा आठ रिंग्ज बनवा, ज्यात अडकवून उभारता येतील.
८) बारीक, चपट्या पट्ट्या आणि गुंडाळून त्याच्या रिंग्ज बनवा. फेव्हिकॉलने रिंग्ज एकमेकांमध्ये अडकवा आणि कडांना फेव्हिकॉल वापरून कागदी पट्ट्या चिकटवा (मुख्य चित्र बघा.) मखराचं शिखर/गोपुर बनवण्यासाठी मोठ्या आणि लहान आकाराच्या रिंग्ज बनवा.
९) लहान आकारांपासून मोठ्या आकारांपर्यंतच्या रिंग्ज रचून फेव्हिकॉलने चिकटवा. (मुख्य चित्र बघा.)
१०) कागदी पट्ट्या घेऊन त्या लंबगोलाकृती कापा.
११) त्रिकोणी कागदी पट्ट्या गुंडाळून त्याचे छोटे बीड्स बनवा. मण्यांच्या कडांना फेव्हिकॉल लावून चिकटवा. अशा प्रकारचे १०० बीड्स बनवा.
१२) फेव्हिक्रिल-वॉटर बेस्ड-ग्लास कलर्स-सी ब्लू ८५३, पिंक ८५६ आणि ऑरेंज ८६० वापरून मणी रंगवा आणि ते सुकण्यासाठी ठेवा.
१३) दोऱ्यात सगळे मणी ओवा. फेव्हिकॉलने धाग्यावर फॉइल मिरर चिकटवून मणी लटकवल्यासारखे लावा.
१४) फेव्हिकॉल वापरून मखरची व्यवस्थित जुळणी करा आणि ते सुकण्यासाठी ठेवा.
१५) फेव्हिक्रिल अक्रेलिक कलर-ब्लॅक-०२ आणि फेव्हिक्रिल अॅक्रेलिक कलर्स पर्ल मेटॅलिक-गोल्ड ३५२ वापरून मखर अँटिक सोनेरी रंगातच रंगवा. ते सुकण्यासाठी ठेवा. मखराच्या तिन्ही बाजूंना दोऱ्याच्या सहाय्याने सुशोभित केलेल्या मण्यांच्या माळा लावा.
१६) पूर्ण तयार झालेलं मखर असं दिसेल.
दर्पण दर्शन
सणासुदीच्या काळात घराला सुशोभित करण्यासाठी क्राफ्ट संकल्पना वापरा. गडद रंगांची आणि आरशांनी सुशोभित केलेली ही मिक्स्ड मीडियाची पार्श्वभूमी मखराची मागची बाजू अधिक आकर्षक बनवेल. गणपती सजावटीचा हा प्रकार घरीच सहजपणे बनवता येईल.
साहित्य: कलर पॅलेट, पाण्याचं भांडं, केशरी रंगाचा कार्ड पेपर, पेन्सिल, पट्टीस कात्री, गोलाकार आरसे (मध्यम व एक मोठ्या आकाराचा), रिसायकल टिश्यू रोल, पेपर कटर.
कृती :
१) २०x२० आकाराचा फाइन आर्ट कॅनव्हास बोर्ड घ्या. त्यावर फेव्हिक्रिल अॅक्रेलिक कलर स्पार्कलिंग पर्ल-व्हायोलेट ९०६ स्पंज करून लावा आणि ते सुकू द्या.
२) केशरी रंगाच्या कार्ड पेपरवर २०x२० आकाराचा चौकोन काढून कापा. हा कागदी त्रिकोणी पद्धतीने घडी घालून फुलाच््या आकाराप्रमाणे योग्य त्या पद्धतीने कापा.
३) साध्या प्रकारे घड्या घालून मोठ्या फुलाचा आकार मिळवता येईल. गणेशमूर्तीच्या पार्श्वभूमीला ठेवण्यासाठी अशा प्रकारची दोन फुलं बनवा.
४) एमडीएफ वूडन प्लेसमेण्ट घ्या. फेव्हिक्रिल अक्रेलिक कलर पर्ल-व्हाइट ३०१ आणि थोडासा फेव्हिक्रिल अक्रेलिक कलर स्पार्कलिंग पर्ल-गोल्डन यलो ९०७ स्पँजच्या सहाय्याने त्यावर लावा आणि ते सुकण्यासाठी ठेवा.
५) फेव्हिक्रिल थ्रीडी कोन आउटलायनर नॉन स्टिकी रेग्युलर-बर्ण्ट सिएन्ना ७०६, फेव्हिक्रिल थ्रीडी कोन आउटलायनर नॉन स्टिकी पर्ल मेटॅलिक-ब्राँझ ३५५ आणि फेव्हिक्रिल थ्रीडी कोन आउटलायनर नॉन स्टिकी ग्लिटर वापरून प्लेसमेण्टच्या परिघापासून मध्यबिंदूपर्यंत प्रत्येक आरसा चिकटवा आणि ते सुकण्यासाठी ठेवा.
६) रिसायकल टिश्यू पेपर रोल घेऊन त्यातून लहान आकाराचा एक गोल कापा. कार्ड पेपरचं मोठं फूल घेऊन फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लूच्या मदतीने टिश्यू रोल चिकटवून त्याला थोडासा उभार द्या. आता हे सुकण्यासाठी ठेवा आणि ते सुकल्यानंतर फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू वापरून फुलाच्या मध्यभागी मोठा आरसा लावा.
७) फेव्हिक्रिल थ्रीडी कोन आउटलायनर नॉन स्टिकी फाइन ग्लिटर-सिल्व्हर ४०१ लावून मोठ्या फुलाच्या पाकळ्या कोरड्या ब्रश स्ट्रोक्सने रंगवा. फेव्हिक्रिल थ्रीडी कोन आउटलायनर नॉन स्टिकी फाइन ग्लिटर-सिल्व्हर ४०२ वापरून कॅनव्हासच्या कडा सुशोभित करा आणि प्रत्येक कोपऱ्यात थोडे आरसे चिकटवा. काही वेळ सुकण्यासाठी ठेवा. पाकळ्यांचा वरचा थर किंचित वरच्या बाजूला राहिल याची दक्षता घ्या.
टाकाऊपासून टिकाऊ
विणण्याचं हे अनोखं तंत्र सणासुदीच्या दिवसांत उत्तम कलाविष्काराची निर्मिती करण्यासाठी योग्य आहे. कागदापासून बनवलेली आणि मेटॅलिक रंगांनी रंगवलेली ही आसनं सजावटीला आणखी सुशोभित करतील.
साहित्य : कलर पॅलेट, पाण्याचं भांडं, जुनी वर्तमानपत्रं, पांढरा कार्टरिग कागद, कात्री, अर्धवट कापलेले मोती, एम्बॉसिंग पॅड
कृती :
१) जुनी वर्तमानपत्रं घ्या. पूर्ण कागदाचा अर्धा भाग कापून घ्या. हा अर्धा कागद एक इंच रूंदीच्या, पातळ पट्टीच्या आकारात गुंडाळून घ्या. दोन्ही बाजू फेव्हिकॉल लावून चिकटवा. अशा प्रकारच्या ३६ पट्ट्या बनवा.
२) वर्तमानपत्राची प्रत्येक गुंडाळी घेऊन एका आड एक विणून घ्या.
३) १८x१८ इंची चौकोनी मॅट तयार होईल अशा प्रकारे विणा.
४) विणलेली मॅट फेव्हिक्रिल अक्रेलिक कलर पर्ल मेटॅलिक-गोल्ड ३५२ने रंगवा आणि सुकण्यासाठी ठेवा.
५) पांढरा कार्टरिज कागद घ्या. फ्लॉवर पंच वापरून फुलं बनवा. अशी २५० फुलं लागतील. आर्टिस्ट्री इंकचे दोन रंग-फॅन्सी फुशिया आणि अमेझॉन ट्रेल वापरून फुलं रंगवा.
६) फुलांचे व्यवस्थित थर रचून फेव्हिकॉलने चिकटवून घ्या. अर्धे कापलेले मोती फेव्हिकॉलच्या सहाय्याने प्रत्येक फुलाच्या मध्यभागी चिकटवा.
७) विणलेल्या मॅटच्या कोपऱ्यांत, मध्यभागी तसंच मूर्तीच्या आजूबाजूला फेव्हिकॉलच्या मदतीने फुलांचे गुच्छ चिकटवून ती सुशोभित करून सुकण्यासाठी ठेवून द्या.
कागदाचं तोरण
आकर्षक ग्लिटर कागदाच्या सहाय्याने सुंदर तोरण बनवता येतं, जे घराची शोभा वाढवेल. गणपती सजावटीसाठी हे तोरण उपयुक्त ठरतं. हे तोरण बनवताना येणारी मजा सणासुदीच्या उत्साहात भर घालते.
साहित्य: कलर पॅलेट, पाण्याचं भांडं, एफोर आकाराचा पांढरा कागद, पेन्सिल, पट्टी, कात्री, चंदेरी रिबीन, रंगीत खडे (जांभळ्या रंगाचे आणि फुलांच्या आकाराचे)
कृती :
१) एफोर आकाराचा पांढरा कागद घ्या. त्यावर मोठ्या आणि लहान आकाराचे फूल काढा. १६x२० इंची आकाराचा फाइन आर्ट कॅनव्हास कागद घ्या. हा कागद फेव्हिक्रिल अक्रेलिक कलर पर्ल मेटॅलिक-गोल्ड ३५२च्या सहाय्याने पूर्ण रंगवा. कॅनव्हास कागदाच्या मागील बाजूस मोठ्या आकाराचं फूल काढा. अशा प्रकारची सात फुलं काढा. ही सर्व फुलं आणि गोलाकार कडा ठेवून कापून घ्या.
२) विविध रंगांच्या ग्लिटर फोन शीट्स घ्या. ग्लिटरच्या मागील बाजूला लहान आकाराची फुलं आणि काही वर्तुळं काढा. प्रत्येक फूल आणि गोलाकार कडांसह कापून घ्या. ते सुकण्यासाठी ठेवून द्या.
३) प्रत्येक ग्लिटर फूल रंगवलेल्या कॅनव्हास कागदावर फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने चिकटवून सुकवण्यासाठी ठेवा. प्रत्येक सोनेरी फुलाला थ्रीडी कोन आउटलायनर नॉन स्टिकी ग्लिटर-सिल्व्हर ४०२च्या मदतीने आउटलाइन काढून ते सुकण्यासाठी ठेवा.
४) घराच्या दरवाजाच्या रूंदीच्या आकाराची चंदेरी रिबीन घ्या. तोरण बनवण्यासाठी फॅब्रिक ग्लूचा वापर करून रिबीनवर ठराविक अंतराने फुलं टांगल्यासारखी चिकटवून घ्या आणि ते सुकू द्या. जांभळ्या रंगाचे, फुलांच्या आकाराचे खडे फॅब्रिक ग्लूचे चिकटवून तोरण आणखी सुशोभित करा.
(स्रोत : हॉबी आयडियाज)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट